

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)
पूरस्थितीमुळे प्रभावित झालेल्या गंगाखेड व खळी परिसरातील नागरिकांसाठी डॉक्टर असोसिएशन, गंगाखेड यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर (दि.२ ऑक्टोबर गुरुवार) रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत खळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडणार असून, पूरग्रस्त व सामान्य नागरिकांना विविध आजारांवरील तपासणी व सल्ला मोफत दिला जाणार आहे.मोफत तपासणी व औषधोपचार देण्यात येणार आहे.
शिबिरात नागरिकांसाठी रक्तदाब,मधुमेह,हाडे व सांधे विकार,हृदयविकार तपासणी तसेच इतर आजारांवरील तपासणी व औषधोपचार पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे.गंगाखेड शहर व परिसरातील अनेक नामांकित डॉक्टर या शिबिरात सहभाग घेणार असून, नागरिकांना थेट त्यांच्याकडून आरोग्य सल्ला मिळणार आहे. ग्रामीण व पूरग्रस्त भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.सामाजिक बांधिलकीतून उपक्रम पूरग्रस्त कुटुंबांना वैद्यकीय सेवा मिळवण्यात अडचणी येत असल्याचे लक्षात घेऊन गंगाखेड डॉक्टर असोसिएशनने हा सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
हा शिबिर केवळ तपासणीपुरता मर्यादित नसून आरोग्याबाबतची जनजागृती घडवून आणणे हाही त्यामागचा उद्देश आहे. “खळी व गंगाखेड परिसरातील सर्व नागरिकांनी, विशेषतः पूरग्रस्तांनी, मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा,” असे आवाहन डॉक्टर असोसिएशन गंगाखेडच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.या शिबिरात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ. के. पी. गारोळे यांनी केले आहे.



