

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.४ऑक्टोबर):- रोटरी क्लब राजुरा यांच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली. स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम समाविष्ट असलेल्या आणि उत्कृष्ट नियोजनातून विकसित केलेल्या एज्युकेशनल आयडियल स्टडी ॲप चे २०० ॲप विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले. हा उपक्रम जिल्हा परिषद माजी शासकीय हायस्कूल राजुरा येथील भव्य मंचावर पार पडला.
या कार्यक्रमासाठी आरटीएन डॉ. ओमप्रकाश गोंड तहसीलदार, राजुरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. राजेश खेरानी, उपप्राचार्य, शिवाजी महाविद्यालय राजुरा आणि वाय. एल. उईके , प्राचार्य, जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजुरा यांच्या शुभहस्ते ॲपचे वितरण करण्यात आले.विद्यार्थ्यांना ॲपबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
डॉ. ओमप्रकाश गोंड साहेबांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव दिसत होते.या कार्यक्रमाला रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष निखिल चांडक, सचिव राजू गोखरे, माजी अध्यक्ष नवल झवर, कमल बजाज, सारंगजी गिरसाळवे, सहसचिव विनोद चने, सदस्य किशोर हिंगाणे, अहमद शेख, मोहनदास मेश्राम, धानोरकर सर, तसेच जिल्हा परिषद हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव राजू गोखरे यांनी केले, तर आरटीएन किरण ढुमने यांनी कुशल संचालन केले. समीर बंदाली सर यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.



