

*जळगाव दि. ५ प्रतिनिधी* – महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या निमित्ताने शिरसोली प्र.न येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत शिरसोली प्र.न यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत परिसरात राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमात ग्रामपंचायत सरपंच व सदस्य हिलाल भिल्ल, रामकृष्ण काटोले, मुदस्सर पिंजारी, श्रावण ताडे तसेच सामाजिक कार्यकर्ते गिरीश वराडे, उमेद अभियानातील महिला वर्ग, आरोग्य सेवक प्रवीण भोळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. गांधी रिसर्च फौंडेशनचे सहकारी डॉ. अश्विन झाला, सुधीर पाटील, दीपक मिश्रा, प्रशांत सूर्यवंशी, विक्रम अस्वार तसेच पीजी डिप्लोमाचे विद्यार्थी यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. या उपक्रमातून ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ या संकल्पनेला बळकटी देत ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. सहभागी सर्वांनी अशा उपक्रमांना सातत्याने हातभार लावण्याचा निर्धार व्यक्त केला.



