

✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812
खटाव(दि.7ऑक्टोबर):-पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत कडगुन गावच्या सीमेवर हॉटेल राजधानीच्या समोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला.
सदर घटना सोमवारी सायंकाळी नऊच्या सुमारास घडली असून मयत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. अनोळखी पुरुष वय 50 ते 55 असून सदर व्यक्ती हॉटेल राजधानीच्या समोर चालण्याचा अनोळखी वाहनाने धडके दिल्याने मयत झाली आहे.
सदर घटनेची माहिती युवराज सोनवणे यांनी पुसेगाव पोलीस स्टेशनला दिली असून अज्ञात वाहन व अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पुसेगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण करत आहेत.



