Home महाराष्ट्र दिसते ते खरे कि दिसत नाही ते खरे?

दिसते ते खरे कि दिसत नाही ते खरे?

240

आता शेतकऱ्यांसाठी लढणारा कोणी नेता नाही. किमान बच्चू कडू तरी आहेत.

     खरे तर ही अपेक्षा कांग्रेस, उद्धव सेना, पवार साहेबांकडून होती. पण ते खूपच भयभीत झाले आहेत. ते बोलायला तयार नाहीत. लढायला तयार नाहीत. जमवले ते बगलेत आवळून आहेत.

   कांग्रेस चे भाऊबंद सोडून शत्रू सैन्यात जाऊन मिळाले. म्हणे, लढण्याआधीच हार मानलेली बरी. जर विश्वासराव पेशवा अब्दालीला जाऊन मिळाला असता तर पानिपत नव्हे पाणी पाणी झाले असते. म्हणून उरलेले कांग्रेस नेते खूपच भयभीत आहेत. यांनी आवाज केला आणि फडणवीस ने जेलमध्ये टाकले तर राहुल गांधी सुद्धा बाहेर काढू शकणार नाही.

      राष्ट्रवादी पवार मंडळी तर गलीतगात्र झाली आहेत. त्यांनी फडणवीस सोबत करार करून घेतला आहे. आपण एकमेकांचे उणे दुरे काढू नये. तुम्ही पण खा आणि मला पण खाऊ द्या. इडीची नोटीस आली तर पवार साहेबांना भेटा. ते वन टाईम सेटलमेंट करुन देतील. हे पैसे घ्या आणि नोटीस रद्द करा.

     उद्धव ठाकरे आजपर्यंत तरी कोणाच्या कामी आले नाहीत. कोणासाठी रडले नाहीत. कोणासाठी लढले नाहीत. ते फक्त त्यांच्या मतलब पुरते बोलतात. मतलब पुरते लढतात. त्यांचा फडणवीस आणि मोदी यांना विरोध सुद्धा नुकसान केले म्हणून आहे. आमदार पळवले म्हणून आहे. उद्धव ठाकरे कधीच सामान्य जनतेचा विचार करीत नाहीत. ते लढू शकत नाहीत. बाळ ठाकरेंची पुण्याई आहे, दहशत आहे म्हणून ते टिकून आहेत. त्यांचेकडे कोणतीही राजकीय विचारसरणी नाही.

    अशा परिस्थितीत जरी बच्चू कडू काही कारणे चुकले माकले तरीही लढण्याचे धाडस तर आहे. तसे संभाजी महाराज सुद्धा शिवाजी महाराजांच्या विरोधात विरोधकांना जाऊन मिळाले होते. पण तितके कारणे त्यांचे अवमुल्यन होत नाही. लोकांनी छत्रपती मानलेच.

     आज रोजी शेतकरी विषयी कोणताही पक्ष लढत नाही. कोणताही नेता लढत नाही. किमान बच्चू कडू तरी गली मैदान करीत आहेत. नपुसंकांपेक्षा बंडखोर तरी बरा.

    हीच अवस्था पंजाब मधे सुद्धा आहे. तेथील शेतकऱ्यांनी अकरा महिने दिल्ली सिमेवर आंदोलन केले. राहुल गांधी आणि कंपनी सोबत राहिली नाही. कारण शेतकऱ्यांविषयी कोणालाही आस्था राहिलेली नाही.

     असा सारासार विचार केला तर बच्चू कडू यांना दोष दिला तरी तेच इतरांपेक्षा चांगले आहेत.डोळ्यांना दिसत आहे. जे दिसते ते खरे कि जे दिसत नाही ते खरे?

✒️शिवराम पाटील(मो:-9270963122)