

शासनाचा ‘समाजरत्न पुरस्कार’ नाकारण्याचा निर्णय घेणारे विदर्भातील प्रख्यात कादंबरीकार, कथालेखक आणि आंबेडकरी विचारसरणीचे प्रखर पुरस्कर्ते तिवस्याचे सुपुत्र रवि सदाशिव दलाल एक पुरोगामी क्रांतिकारी बहुजन साहित्यिक आहेत, हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे.
हा समाजरत्न पुरस्कार मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण समिती, नवी दिल्लीतर्फे दिला जातो. या वर्षी हा पुरस्कार महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांपैकी प्रसिद्ध बहुजन साहित्यिक रवि दलाल यांना जाहीर झाला होता. हा समारंभ दि.१० डिसेंबर २०२५ रोजी नवीन महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे. रवि दलाल यांच्या सामाजिक वास्तवावर आधारित असलेले साहित्य म्हणजे
१ ) *संशोधन ग्रंथ -*
अवधूती भजन बौद्ध धर्मातील प्रवाह
*आंतरराष्ट्रीय रॉक्स पुरस्कार प्राप्त*
*प्रकाशित काव्यसंग्रह -*
१ ) युद्धमय २ ) वादळरेषा
३ ) आम्ही स्वातंत्र्यात प्रवेश करतो,
*प्रकाशित कांदबऱ्या*
१ ) नामा २ ) बेगळ ३) शंकरपट ४ ) सावजी चाळ,5)बेगळ ६ ) पुरणपोळी ७ ) मास्तर ८ ) एक घाव सुखाचा ९ ) संथ वाहते वरदाई,10)पारध
11) कानू सोनू आणि महार पारडीचा इतिहास
*प्रकाशित कथासंग्रह -*
१ ) वेंलाटी २ ) खपरेलाची पायवाट, ३ ) आभाळव्रण ४ ) तीन खून, ५ ) वेदनेचे वेद,
आणि अनेक लेखसंग्रहांच्या परिवर्तनवादी प्रभावी लेखनाची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली होती.मात्र या पुरस्काराचा कार्यक्रम बीजेपीच्या माध्यमातून पार पडणार असल्याचे समजताच साहित्यिक रवि दलाल यांनी ठाम निर्णय घेत बीजपीचे विचारधन आणि धोरण संविधानविरोधी आहे आणि मी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अनुयायी आहे. त्यामुळे अशा पक्षाच्या माध्यमातून मिळणारा कोणताही पुरस्कार मी स्वीकारणार नाही, असे रवि दलाल यांनी जाहीर केले.रवि दलाल हे बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते असून सामाजिक न्याय,समता आणि आंबेडकरी विचार यांचे प्रखर प्रवर्तक आहेत.त्यांच्या लेखनातून वंचित,शोषित समाजाच्या वेदना आणि संघर्षाचे चित्रण प्रभावीपणे दिसते. साहित्यविश्वात त्यांच्या या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.अनेकांनी त्यांच्या या पुरोगामी तत्त्वनिष्ठ भूमिकेचे स्वागत केले असून पुरस्कारापेक्षा विचार मोठे असतात हे त्यांनी सिद्ध केले आहे.साहित्य विश्वास त्यांच्या या निर्णयाचे स्वागत आणि कौतुक होत आहे. रविजी आपल्या फुले – शाहू – आंबेडकरी विचारधारेला सलाम आणि क्रांतिकारी जयभीम.

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)







