

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.8नोव्हेंबर):-मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी एकनिष्ठ आणि भाजपामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत राहून संघटनेच्या माध्यमातून प्रामाणिक व निष्ठेने काम करणारे माजी विरोधी पक्षनेते अकील काझी यांच्या पत्नी सौ. तस्लिम अकील काझी या यंदाच्या म्हसवड नगरपरिषदेच्या निवडणुकीत पक्षाने आदेश दिल्यास व भाजपाकडून उमेदवारी मिळाल्यास निवडणुकीसाठी झाल्या आहेत.
कॉलेज जीवनात आखिल भारतीय विद्यार्थी परिषदे च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवत असताना त्यांचा सम्बंध मा. श्री. विनोद तावडे यांच्याशी संबंध आला आणि तिथूनच त्यांनी समाजसेवा आणि राजकारणास खऱ्या अर्थाने सुरुवात केली ती आजतागायत चालूच आहे
अकील काझी हे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे अत्यंत निष्ठावंत, प्रामाणिक व विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.गल्लीपासुन दिल्ली पर्यंतच्या
सर्व शासकीय कार्यालयातील उच्च पदस्थ अधिकारी वर्गाशी घरोब्याचे संबंध असल्यामुळे प्रशासनावरही त्यांची चांगली पकड आहे.
2011 च्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष यांना अपात्र करून एक प्रभावी नेतृत्व म्हणून उदयास आले आणि आपली घोडदौड चालू ठेवली.
म्हसवड नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी नागरिकांच्या विविध प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवला असून, जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा चांगला दबदबा आहे.माण तालुक्याच्या पूर्वेकडील भागात जनतेशी त्यांचा दांडगा जनसंपर्क असून त्या त्या भागातील सामान्य जनतेची संजय गांधी निराधार योजना, अपंग, शालेय विद्यार्थी, निराधार लोकांचेसाठी आधार बनून गेली कित्येक वर्षे जनसेवा करत आले आहेत.कोविड काळात स्वतः कोविड पॉसिटीव्ह असताना अनेक रुग्णाना त्यांनी त्यांच्या उपचारासाठी मोठी मदत केली आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी असलेली त्यांची सातत्यपूर्ण निष्ठा व त्यांच्या खांद्याला खांदा लावून आणि विकासाभिमुख कार्यपद्धती यामुळे ते स्थानिक राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व बनले आहेत.
सौ. तस्लिम काझी या सामाजिक कार्यातही सक्रिय असून, महिला बचत गट, आणि समाजसेवी उपक्रमांमधून त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्यशैलीत सौम्यता, संयम आणि लोकाभिमुख दृष्टिकोन दिसून येतो.
भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून अकील काझी यांनी म्हसवड शहरात पक्षाची मुळे घट्ट रोवण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांचा लाभ त्यांच्या पत्नींना या निवडणुकीत मिळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.







