Home चंद्रपूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत ग्रामगीता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश 

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत ग्रामगीता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश 

146

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.14डिसेंबर):-पंचायत समिती चिमूरतर्फे आयोजित ५३ वी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी २०२५ ही मधुवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जांभुळघाट येथे २७ ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत उत्साहात पार पडली. प्रदर्शनीचे उद्घाटन २७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले असून तालुक्यातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या प्रदर्शनीत गैर आदिवासी माध्यमिक विभागातून ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळविला. महाविद्यालयाच्या अकरावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी ‘कार्बन अब्झॉर्बर’ हे विज्ञान मॉडेल तयार करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या यशस्वी संघात साहिल पिंपळकर, अभिषेक धारणे, लोहित उईके व सुजल कापसे यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना प्रा. स्नेहाली बांबोडे व प्रा. प्रगती लेकुरवाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले, प्रा. मेहमूद पठाण तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.