Home महाराष्ट्र ब्रम्हीभूत रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या पादुकांची गंगाखेड शहरात भव्य मिरवणूक

ब्रम्हीभूत रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या पादुकांची गंगाखेड शहरात भव्य मिरवणूक

149

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.16डिसेंबर):-ब्रम्हीभूत वेदांत केसरी रंगनाथ महाराज गुरुजी परभणीकर यांच्या पावन पादुकांचे गंगाखेड शहरात अत्यंत भक्तिभावात व उत्साहपूर्ण वातावरणात (दिनांक १५ डिसेंबर सोमवार) रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली.पादुकाचे विधी,पूजन व आरती करण्यात आली.त्यानंतर फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये पादुका विराजमान करण्यात आल्या. टाळ-मृदंगाच्या गजरात,वारकरी, भाविक, महिला-भगिनी, तरुण व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी फुलांची उधळण करून पादुकांचे दर्शन घेतले.नगरेश्वर मंगल कार्यालय येथून मिरवणुकीस सुरुवात होऊन सराफा मार्केट भगवती चौक,श्रीराम चौक नरवाडे कॉर्नर मार्गे नगरेश्वर मंगल कार्यालय येथे सांगता झाली.या मिरवणुकीमुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले असून जय जय रामकृष्ण हरि नामघोषांनी परिसर दुमदुमून गेला.

श्री रंगनाथ महाराज गुरुजी परभणीकर यांच्या 56 व्या पुण्यतिथीनिमित्त समस्त आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने गंगाखेड येथील नगरेश्वर मंगल कार्यालयामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.दिनांक 9 डिसेंबर मंगळवार रोजी सप्ताहाला सुरुवात होऊन आज दिनांक 16 डिसेंबर मंगळवार रोजी श्री ह भ प महादेव महाराज राऊत यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

संपूर्ण सप्ताहभर महाराष्ट्रातील नामवंत महाराजांचे प्रवचन व कीर्तन संपन्न झाले. सप्ताहामध्ये सकाळी सहा ते नऊ ज्ञानेश्वरी पारायण, दहा ते बारा गाथा भजन दुपारी एक ते दोन गीता पारायण, दुपारी दोन ते तीन महिला भजनी मंडळ सायंकाळी पाच ते सहा प्रवचन सहा ते सात धुपारती रात्री आठ ते दहा हरिकीर्तन अकरा ते एक हरी जागर पहाटे चार ते सहा काकड आरती संपन्न झाली.धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहरातील समस्त आर्य वैश्य समाज बांधव महिला पुरुष व युवकांनी परिश्रम घेतले