Home महाराष्ट्र भाकपाचा त्याग, संघर्ष व बलीदानाची १०० वर्ष पूर्ण करुन शताब्दी महोत्सव साजरा

भाकपाचा त्याग, संघर्ष व बलीदानाची १०० वर्ष पूर्ण करुन शताब्दी महोत्सव साजरा

59

▪️भाकपा च्या शताब्दीवर्षा निमित्ताने पार्टीने लालध्वजाचे ध्वजारोहण

▪️भाकपा राज्य सचिव मंडळ सदस्य डाॅ.काॅ.महेश कोपूलवार यांचे प्रतिपादन

✒️आरमोरी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

आरमोरी(दि.39डिसेंबर):- ‌भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना दि.२६ डिसेंबर १९२५ झाली.आज या घटनेला १०० वर्ष पूर्ण झाली.पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतुलनीय त्याग, संघर्ष,बलीदान व जनसेवा केला. कष्टकरी वर्गाच्या अधिकार व न्यायासाठी सतत चळवळ, तात्त्विक मांडणी , प्रबोधन यामुळेच पक्षांचे महत्त्व आजही कायम आहे.या पक्षाची स्थापना करतांना उद्देश हा होता की, राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणे व भविष्यात या देशात समाजवाद आणणे.पक्षाच्या संकल्पनेपासून आणि स्थापनेपासून कम्युनिस्टांनी व कम्युनिस्ट पक्षाने स्वातंत्र्य आंदोलनात क्रियाशील व प्रभावी भाग घ्यायला सुरुवात केली.देशाच्या साम्राज्यवादी स्वातंत्र्य आंदोलनात पक्षाचे मुळ आहे.आणि पक्षाने स्थापनेपासूनच स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत हि भूमिका यशस्वीपणे पार पाडली म्हणून हा पक्ष आपला शंभर वर्षे पूर्ण करुन शताब्दी महोत्सव साजरी करीत आहे.असे प्रतिपादन डाॅ.काॅ.महेश कोपूलवार यांनी केले.

या निमित्ताने आरमोरी येथे भाकपा पार्टी कायार्लयात ज्येष्ठ काॅ.चंद्रभानजी मेश्राम यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

         यावेळी भाकपा चे जिल्हा सचिव काॅ.देवराव चवडे, जिल्हा सहसचिव अँन्ड.काॅ.जगदिश मेश्राम,काॅ.प्रकाश खोब्रागडे, सुरेश फुकटे,संजय वाकडे ,काॅ.मिनाक्षी सेलोकर,प्रशांत खोब्रागडे,किरण सोरते,अर्चना दुमाने,दर्शना धाकडे,रेखा गणवीर,माधुरी रामटेके,आशा इंकने,वर्षा बेहरे,गीता सोरते,कुसूम तितीरमारे, कविता चन्ने, रंजना कांबळे ,ऋषी रामटेके इत्यादी उपस्थित होते.

पुढे बोलतांना काॅ.कोपूलवार म्हणाले कम्युनिस्टांचा राष्ट्रीय पटलावरील उदय व कम्युनिस्ट आंदोलनाचा वाढता जोर यामुळे स्वातंत्र्य, पूर्ण स्वराज्य, म्हणजे वसाहतवादविरोधी,सरंजामशाहीविरोधी क्रांती पूर्ण करणे हे या देशातील जनतेला कडून चुकले.यात संस्थानी पध्दत व जमिदारी पध्दत रद्द करणे,कसणाऱ्याला जमिन,आठ तासाचा कामाचा दिवस, अस्पृश्यांना सामाजिक न्याय,संघटन,सभा,संप, आदींचे अधिकार मिळाले पाहिजे.

भाकपा स्वातंत्र्य प्राप्तीस व सर्वहारा वर्ग संघर्ष अधिक तीव्र करण्यासाठी आपल्या पक्षांतर्गत विविध सर्व वर्गातील जनतेसाठी अनेक संघटना स्थापन करुन आजही जोमाने सक्रिय कार्यकर्ते कार्य करीत आहेत.या मध्ये 

आयटकची १९२० साली स्थापना होऊन भारतीय कामगार वर्गाची् एकजुटीची व प्रमुख संघटना बनली होती.सहजानंद सरस्वती,इंदुलाल याज्ञिक यांच्या नेतृत्वाखाली १९३६ साली शेतकऱ्यांची अखिल भारतीय किसान सभेची स्थापना करण्यात आली.नंतर भारतीय शेतमजुरांचे वर्गिंय संघटन करुन भारतीय खेत मजुर युनियन ची स्थापना करण्यात आली.ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन या विध्यार्थी संघटनेची स्थापना करण्यात आली. लेखक,कवी वाड्.मयीन समीक्षक यांचेसाठी १९३६ ला पुरोगामी लेखक संघाची स्थापना करण्यात आली.पुढे आणखी एक मोठे पाऊल टाकूण इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन (गप्पा )१९४३ ला स्थापना करण्यात आली. या मार्फत आपल्या महान राष्ट्रीय व विविधता पूर्ण संस्कृतीतील पुनरुत्थान लोकांपर्यंत पोहचले.तसेच १९७० च्या आसपास स्त्रियांचे लढावू संघटन नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमेन ची स्थापना करण्यात आली.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष यापुढे देखिल संविधानीक मुल्यांसाठी कष्टकरी, शोषित,वंचित सर्वसामान्य जनतेच्या समस्यांच्या हक्कासाठी संघर्ष करीत भाकपा राहणार आहे.