Home महाराष्ट्र ड्रोनच्या साह्याने नेर डावा कालवा उजवा कालव्याची पाहणी

ड्रोनच्या साह्याने नेर डावा कालवा उजवा कालव्याची पाहणी

158

✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

खटाव(दि.8जानेवारी):-सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील खटाव मध्ये ड्रोनच्या साह्याने नेर धरणाचा डावा कालवा उजवा कालवा यांची पाहणी करण्यासाठी सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती खटाव अभियंता सातव यांनी दिली.

           वारंवार कळवा, पाट फुटणे यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने कायमस्वरूपी पऱ्याया साठी ड्रोनच्या साह्याने पाहणीचे नियोजन केले आहे. साधारण 53 किलोमीटर किलोमीटरचा डावा कालवा उजवा कालवा आणि मुख्य कालवा असे पाटाचे स्वरूप आहे.पाट स्वच्छता काम सुरू असून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पाणी येईल असे यावेळी अभियंता सातव यांनी सांगितले.

मागच्या काही महिन्यापासून ड्रॉन च्या बाबतीत अनेक तर्क वितर्क लावले जात असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असल्यामुळे संदर्भात संबंधित विभाग प्रमुखांनी ज्या भागात पाहणी करायचे आहे त्या भागातील लोकांच्याशी संवाद साधने अथवा प्रसन्न माध्यमाच्या मार्फत माहिती सांगणे गरजेचे आहे म्हणजे नको त्या चर्चांना उधान येणार नाही.