Home चंद्रपूर जमिनीच्या वादातून जावयानेच सासऱ्याचा गळा दाबला

जमिनीच्या वादातून जावयानेच सासऱ्याचा गळा दाबला

420

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर/भंडारा: जिल्ह्यातील कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोकणागड गावात शनिवारी सकाळी घडलेल्या हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून जावयाने स्वतःच्या सासऱ्याचे गळा दाबला, हत्या केल्याचे धक्कादायक घटना घडली.

         कौटुंबिक संपत्तीच्या वादातून एका जावयाने आपल्या मित्राच्या मदतीने ६५ वर्षीय सासऱ्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कारधा पोलीस ठाणा अंतर्गत कोकणागड शिवारात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जावई आणि त्याच्या एका साथीदारा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. किशोर धर्मा कंगाले वय ६५ रा. भंडारा ह.मु. कोकणागड असे मृतकाचे नाव असून अमित रमेश लांजेवार वय ३५ रा. शिवाजी वार्ड. शुक्रवारी, भंडारा असे आरोपी जावयाचे नाव आहे.

मृतक किशोर कंगाले है गेल्या आठ महिन्यांपासून त्यांचा जावई अमित लांजेवार याच्या भीतीने कोकणागड येथे आपल्या पुतण्या मंगेश कंगाले यांचेकडे राहत होते. दि ९ जानेवारी २०२६ रोजी किशोर कंगाले हे शिंगोरी येथील शेतात दुचाकीने गेले होते. मात्र ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. तेव्हा त्यांचा शोध घेतला असता असे लक्षात आले की, घटनेच्या दिवशी सायंकाळी किशोर कंगाले यांनी आपला मित्र सुनील चौधरी याला फोन करून ‘जावई अमित आणि त्याचा मित्र मला रस्त्यात अडवून मारहाण करत आहेत, असे सांगितले होते.

त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेतात मृतकाचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि कपडे आढळून आले. सुरुवातीला कारधा पोलीस ठाण्यामध्ये ‘मिसिंग ची नोंद करण्यात आली होती. मात्र, दि ११ जानेवारी रोजी सकाळी १२ वाजताच्या दरम्यान कोकणागडकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरील पुलाच्या सिमेंट पाईप मध्ये किशोर कंगाले यांचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. आरोपी अमित लांजेवार आणि त्याच्या अज्ञात साथीदाराने संगनमत करून किशोर कंगाले यांचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुलाखाली लपवून ठेवला.

असा आरोप फिर्यादी मंगेश कंगाले यांनी केला असून आरोपी पळून गेले आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक निलेश मोरे, सहायक पोलिस अधीक्षक मयंक माधव, कारधा ठाणेदार गोकुल सूर्यवंशी दाखल झाले व त्यांच्या मार्गदर्शनात घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करीता पाठविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारधा पोलिस करीत आहे. या घटने मुळे परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक वादाचे हे भयानक स्वरूप पाहून हळहळ व्यक्त होत आहे.