

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.26जानेवारी):-ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे दिनांक 20,21 व 22 जानेवारी 2026 ला वार्षिक स्नेहसंमेलन “युवा स्पंदन-2025-26” चे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 21 जानेवारी 2026 ला सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. सुनंदा आस्वले व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रोशनीताई वडेट्टीवार, संचालक,सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण मंडळ, गडचिरोली व प्रा. डॉ. शशिकांत आस्वले, निवृत्त, वित्त व लेखाधिकारी, संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती, प्रा. डॉ.संदीप सातव,संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, प्रा. डॉ. निलेश ठवकर, न्याक समन्वयक, प्रा. डॉ. प्रणाली टेंभुर्णे, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मंचावर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. सुनंदा आस्वले यांच्याकडून रोशनीताई वडेट्टीवार व प्रा. डॉ. शशिकांत आस्वले यांचा शाल,श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना संबोधित केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संचालन प्रा.कु. प्रज्ञा खोबरागडे, प्रास्ताविक प्रा. डॉ.प्रणाली टेंभुर्णे व आभार प्रदर्शन प्रा. कु. स्नेहाली बांबोडे यांनी केले. त्यानंतर दिनांक 22 जानेवारीला समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. सुनंदा आस्वले व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गणपत देशमुख, प्राचार्य,महात्मा गांधी महाविद्यालय, नागभीड, डॉ. संदीप सातव, प्रा. डॉ. निलेश ठवकर, प्रा. डॉ. सुमेध वावरे, प्रा. डॉ. प्रणाली टेंभुर्णे, प्रा. मेहमूद पठाण हे मंचावर उपस्थित होते. गेल्या तीन दिवसापासून विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कबड्डी,क्रिकेट, व्हॉलीबॉल, दौड,लगोरी,कोलाज, रांगोळी, मेहंदी,गीत गायन व नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. समरोपीय कार्यक्रमांमध्ये डॉ.गणपत देशमुख यांनी विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना व त्यांच्यामधील असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळत असतो व त्यांचा आत्मविश्वास हा वाढत असतो, असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणातून संबोधित केले.
तसेच प्रा.डॉ.संदीप सातव, यांनी शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी 2024-25 मध्ये प्राविण्य मिळविले त्यांचा अहवाल वाचून दाखविला व पाहुण्यांच्या हस्ते कलर कोट व चषक देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या समारोपीय कार्यक्रमांमध्ये क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा अहवाल वाचन प्रा. प्रणिता मानापुरे यांनी वाचून दाखविला. प्रा.मेहमूद पठाण व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुनंदा आस्वले यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले व प्रमुख पाहुणे, डॉ.गणपत देशमुख यांच्याकडून सर्व स्पर्धेमधील विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व चषक देऊन, पुढील वाटचाली करीता विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे विद्यार्थी विकास विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तर्फे आयोजित “युवा महोत्सव -भरारी 2024-25″मधील विजयी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे चषक देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन, प्रा.श्रद्धा डोईजाड, प्रास्ताविक प्रा.सरताज शेख व आभार प्रदर्शन प्रा. प्रज्ञा खोब्रारागडे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.







