

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.30जानेवारी):-तालुक्यातील मांडवा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राबविल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने ग्रामपंचायत व लोकसहभागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचा लोकार्पण सोहळा दि. २६जानेवारी रोजी पार पडला.
वाचनालयाचा लोकार्पण सोहळा ॲड आप्पाराव मैंद यांच्या हस्ते तथा उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यासाठी अनुकुल चव्हाण यांनी ७०१० रुपयाची तर ॲड. आप्पाराव मैंद यांनी २५पुस्तके, ग्रामपंचायत अधिकारी एस.टी.तडसे यांनी १२, आर्मी पंजाब राठोड यांनी २स्पर्धा परीक्षेचे पुस्तके भेट दिली. तर शरद ढेंबरे यांनी६ खुर्च्या, नथ्थू ढोले, प्रभाकर ढोले यांनी प्रत्येकी एक लोखंडी रॅक, किशोर मुजमुले यांनी दोन फॅन, सरपंच अल्का ढोले १टेबल, गजानन आबाळे यांनी १ टेबल, योगेश ढोले, निर्भय गायकवाड, भारतीय सैनिक गोपाल वानखेडे, यांनी प्रत्येकी एक हजार रुपये, तर पो. पा. दत्तराव पुलाते,साहेबराव ढोले, विठ्ठल आडे, शक्ती आडे, ग्रा.पं. कर्मचारी प्रदुम्न आबाळे, सुधीर धाड, यांनी प्रत्येकी पाचशे रुपये देणगी दिली.
भिमराव ढोले, रमेश ढोले,पिंटू ढोले, दयाशील ढोले, आकाश चवरे, अविनाश ढोले,डि के,रवि ढोले,राजु ढोले, वैभव ढोले, आकाश ढोले,भुषण ढोले, प्रविण काबळे,बारकु वाघमारे, विश्वास कांबळे,हे अथक परिश्रम घेत आहेत.







