

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमुर(दि.2फेब्रुवारी):-व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम अंतर्गत देशातील पत्रकारांची सर्वात जास्त सदस्य संख्या असणाऱ्या व्हॉइस ऑफ मिडीया या संघटनेच्या चिमुर तालुका अध्यक्ष पदी पंकज मिश्रा तर सरचिटणीस पदावर शुभम बारसागडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शासकिय विश्रामगृहात चिमुर तालुका व्हॉइस ऑफ मिडीयाची बैठक जिल्हा अध्यक्ष अनिल बाळसराफ यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा सरचिटणीस श्रीहरी सातपुते, व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश डांगे, जेष्ठ मार्गदर्शक भरत बंडे, जितेंद्र सहारे प्रामुख्याने उपस्थित होते.
या सभेत मागील कामाचा आढावा घेवुन भविष्यातील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यावेळी चिमुर तालुका व्हाईस ऑफ मिडीयाच्या चिमूर तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली. या कार्यकारणीमध्ये अध्यक्ष पंकज मिश्रा, कार्याध्यक्ष फिरोज पठाण, उपाध्यक्ष नितीन पाटील, उमेश शंभरकर, सरचिटणीस शुभम बारसागडे, सह सरचिटणीस विलास मोहिणकर, कोषाध्यक्ष विकास खोब्रागडे, कार्यवाहक योगेश सहारे, संघटक संजय नागदेवते, प्रसिद्धी प्रमुख सुनिल हिंगणकर, सदस्य समिर बलकी, नरेंद्र नागोसे, संकेत मांडवकर, शार्दुल पचारे, सुशांत इंदुरकर, रामचंद्र कामडी यांचा समावेश आहे.
यावेळी कार्यक्रमाचे संचालन श्रीहरी सातपुते यांनी केले तर उपस्थितांचे आभार नितीन पाटील यांनी मानले.







