

▪️नवनिर्वाचित नगरसेवक मा.संजय गव्हाळे यांचा सत्कार संपन्न
▪️संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्था व कै.मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठानचे आयोजन
✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.10फेब्रुवारी):-” पक्षाच्या सूचनेनुसार तटस्थ भूमिका घेणारे,स्थानिक स्वराज्य संस्थेतील जनतेच्या मनात असलेले प्रतिनिधी, आपल्या प्रभागाच्या (वार्डाच्या) सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी नगरसेवक पदापूर्वी सतत कार्यरत असलेले जनसेवक,प्रभागातील स्वच्छता,पाणी पुरवठा,आरोग्य यासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे नगरसेवक मा.संजय गव्हाळे आहेत.आता प्रत्यक्ष नगरसेवक म्हणून निवडून आल्यामुळे त्यांच्या या कार्याची गती वाढून एक आदर्श नगरसेवक म्हणून ते नावारूपास येतील यात शंका नाही.”असे विचार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी नगरसेवक मा.संजय गव्हाळे यांच्या सत्काराप्रसंगी काढले.
दि.७ फेब्रुवारी २०२६ ला उबाठाचे प्रभाग क्रमांक २० मधून,सूतगिरणी,गोपाल नगर येथील नवनिर्वाचित नगरसेवक मा.संजय गव्हाळे व सौ.वंदना संजय गव्हाळे यांचा सपत्निक सत्कार शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनिल भागवतकर,कै.मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,कृष्णा मोहोकर ,संजय खंडारे, प्रभाकरराव बुंदिले,आशीष गव्हाळे,उमेश खंडारे, पुंडलिकराव लोखंडे व दोन्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवक संजय गव्हाळे यांचा सत्कार करून हार्दिक अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नगरसेवक मा.संजय गव्हाळे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की,” सत्काराबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. सूतगिरणी,गोपाल नगर येथील जनतेने जो माझ्यावर विश्वास ठेवून मला भरपूर मतांनी निवडून आणले त्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो व प्रभागाचे प्रत्येक कार्य मनापासून करण्याचे आश्वासन देतो.”अशा भावना व्यक्त केल्या.







