Home महाराष्ट्र केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते समीर देसाई यांचा ‘उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्काराने...

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते समीर देसाई यांचा ‘उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्काराने गौरव : अनिल जायभाये बीडकर

185

✒️अनिल जायभाये बीडकर(विशेष प्रतिनिधी)मो:-9011772189

▪️महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मिडिया यांच्या माध्यमातून निर्भीड पत्रकारिता

 सांगली(दि.17फेब्रुवारी):-पत्रकारिता क्षेत्रातील आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई) डिजिटल मीडिया, पुणे जिल्हाध्यक्ष समीर देसाई यांना ‘उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला.

सांगली-मिरज येथील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर देशातील नामवंत पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार संजय भोकरे, News18 लोकमतचे संपादक मंदार फणसे आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्याचा गौरव :

समीर देसाई यांनी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून सामान्यांचे प्रश्न मांडत असतानाच प्रशासकीय त्रुटींवरही नेमके बोट ठेवले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी वृत्तांकनाची दखल घेऊनच हा राज्यस्तरीय स्तरावरील सन्मान त्यांना बहाल करण्यात आला आहे.

मान्यवरांकडून कौतुक :

पुरस्काराला उत्तर देताना देसाई यांनी हा सन्मान सर्व कष्टकरी पत्रकारांचा असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या निर्भीड पत्रकारितेचे कौतुक केले. या गौरव सोहळ्यास जिल्ह्यातील पत्रकार, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. समीर देसाई यांच्या या यशामुळे त्यांच्यावर सर्व महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.