

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.१८फेब्रुवारी):-राजुरा येथे एका खाजगी कॉन्व्हेन्ट मधे कार्यरत असलेल्या तत्कालीन शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून राजुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ मधील ख्रिसमस सुट्टीदरम्यान नवीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने अभ्यासासंदर्भात शंका विचारण्यासाठी शिक्षकाला फोन केला होता.
ती राजुरा येथे आल्याचे सांगताच संबंधित शिक्षकाने तिला थांबण्यास सांगितले. काही वेळानंतर तो आपल्या दोन मित्रांच्या मदतीने तेथे आला आणि मुलीला राजुरा येथील एका लॉजवर नेल्याचा आरोप आहे. तेथे तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाची तक्रार कॉन्व्हेंटचे प्राचार्य यांनी राजुरा पोलिस ठाण्यात दिली.
त्यानुसार तत्कालीन शिक्षक श्रीनिल कांबळे (वय २७) तसेच त्याला मदत करणारे सह आरोपी रोहित जुलमे (वय २३) आणि बन्नी सल्लाम (वय २४) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम ६४(२)(फ), ६४(२)(आय), ६५(१) तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४,८ आणि १२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सुमित परतेकी, महिला उप निरीक्षक कोमल घाडगे पुढील तपास करीत आहे. समाजाला काळिमा फासणारी घटना आहे.







