Home चंद्रपूर वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा वंचित मध्ये प्रवेश

वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा वंचित मध्ये प्रवेश

432

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

 ब्रम्हपुरी(दि.21फेब्रुवारी):-संपुर्ण महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकतीने सर्व निवडणुका लढणार आहे. ऍड बाळासाहेब आंबेडकर संपुर्ण राज्यात सर्व वंचित, शोषित, पिडीत, मजुर, शेतकरी, बेरोजगार, विद्यार्थी यांच्या हक्काची लढाई संविधानिक, न्यायालयीन तथा रस्त्यावरच्या लढाइतुन लढत आहेत.

बहुजन समाजातील ओबीसी, एससी, एसटी समाजघटकांच्या न्यायासाठी बाळासाहेब आंबेडकर अविरत लढा देत आहेत. त्यामुळे ब्रम्हपुरी तालुक्यात पंचायत समिती,जिल्हा परिषद व ग्रामपंचायत चे जास्तीत जास्त उमेदवार निवडुन जावेत व आपल्या बहुजनांच्या समस्या त्यांनी सोडवाव्यात या उद्देशाने भव्य कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यातून अनेक विषयांवर व पक्ष्याच्या संघटन बांधणीवर विचारमंथन करून कार्यकर्त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांचे कर्तव्य समजाऊन सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. कुशलभाऊ मेश्राम राज्य कार्यकारिणी सदस्य यांनी पक्षाची रणनीती यावर रीतसर प्रकाश टाकला तर मार्गदर्शक म्हणुन विदर्भ समन्वयक बाळु टेम्भूर्णे, जिल्हाध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे, जिल्हाध्यक्षा कविताताई गौरकर, युवा जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे, जिल्हा सल्लागार डॉ प्रेमलाल मेश्राम, ऍड नागदेवते साहेब, जिल्हा उपाध्यक्ष डी एम रामटेके, जिल्हा सचिव अरुण सुखदेवे, जिल्हा उपाध्यक्षा लिनाताई रामटेके, नागभीड तालुकाध्यक्ष चंदन कोसे या सर्वांनी उपस्थितांना प्रभावी मार्गदर्शन केले. यावेळी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत युवक काँग्रेस चे शहर अध्यक्ष सुरज मेश्राम यांनी अनेक कार्यकर्त्यांसोबत वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश केला व पक्षवाढीसाठी काम करण्याचा निर्धार केला.

या भव्य कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष लिलाधर वंजारी यांनी केले तर सूत्रसंचालन महासचिव मिलिंद घोरमोडे व उपस्थितांचे आभार महासचिव नरेंद्र मेश्राम यांनी मानले. हा मेळावा झाडे मिटिंग हॉल आरमोरी रोड ब्रम्हपुरी येथे घेण्यात आला यावेळी तालुक्यातील पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.