Home महाराष्ट्र आर टी ई 25% प्रवेश जाचक अटी रद्द करण्याची संध्या रणवीर यांची...

आर टी ई 25% प्रवेश जाचक अटी रद्द करण्याची संध्या रणवीर यांची मागणी 

316

✒️महागांव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

महागांव(दि.4मार्च):-आर. टी. ई. अंतर्गत 25% प्रवेशासाठी यावर्षी नवीन लादलेल्या अटी रद्द करण्यात येऊन विध्यार्थ्यांना सुलभ प्रवेश मिळावा या न्याय मागणीचे निवेदन शिक्षणमंत्री महाराष्ट्र शासन यांना सौं संध्या संदेश रणवीर यांनी पाठवून विद्यार्थी हितार्थ न्याय मागणी केली आहे.

आर टी ई 25%अंतर्गत गरीब,गरजू व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाची मोफत प्रवेशाची संधी आहे.यात जाचक अटी टाकण्यात आल्याने अनेक पालकांना अडचणीला सामोरे जावे लागणार आहे यात पूर्वीची 3 किलोमीटर हवाई अंतराची अट काढून 1 किलोमीटर केल्याने अनेक विध्यार्थ्यांना या प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे.

शिक्षणाचा हक्क कायद्यात हवाई अंतराचा कुठलाही उल्लेख नसताना ही अट टाकण्यात आली असून हा बेकायदेशीर अन्याय असून ही अट रद्द करावी सोबतच भाडे करार नोंदणी साठी दुय्यम निबंधक कार्यालयाची सक्ती करण्यात आली असून त्याऐवजी केवळ 100 रुपयाच्या भाडेकरार किंवा घरमालकाच्या संमतीवरही प्रवेश द्यावा जेणेकरून विध्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सुलभता येईल या दृष्टीने कार्यवाही व्हावी अशी मागणी संध्या रणवीर यांनी निवेदनातून केली आहे.