Home महाराष्ट्र जमाअते इस्लामी हिंद पुसद व जामा मस्जिद ट्रस्ट तर्फे ईद मिलन आणि...

जमाअते इस्लामी हिंद पुसद व जामा मस्जिद ट्रस्ट तर्फे ईद मिलन आणि मस्जिद परिचय कार्यक्रम संपन्न 

82

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.25मार्च):-येथे रमजान ईद निमित्ताने मस्जिद परिचय व ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यामध्ये पुसद येथील सर्व जाती धर्माच्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संघटना व नागरिकांना आमंत्रित करण्यात आले होते.या मध्ये दिगंबर जगताप विभागीय अध्यक्ष मराठा सेवा संघ महाराष्ट्र, लक्ष्मण कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन पर्व उत्सव समिती पुसद, 

एडवोकेट जांभुळकर समता सैनिक दल पुसद,हरगोविंद कदम शहराध्यक्ष मराठा सेवा संघ पुसद, संतोष सुरवाडे राज्य प्रशिक्षक भारत मुक्ती मोर्चा, गणपतराव गव्हाणे आदिवासी परिषद भारत मुक्ती मोर्चा,राजू सोळंके नगरसेवक, समीर गवळी नगरसेवक गावातील आणि गडी वार्डातील विशेषतः आणि शिक्षक वृंद आवर्जून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ही हाफिज खलील शम्सी यांनी पवित्र कुरआन पठणाने केली तर प्रास्ताविक शेख नईम साहेबांनी ठेवले त्या नंतर या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते मुजीब देवणीकर साहेबांनी मस्जिद परिचय अत्यंत सध्या आणि सोप्या मराठी भाषेत ठेवला त्यात त्यांनी मस्जिद मध्ये आत आल्या नंतर ते आजान,नमाज,खुतबा या संकल्पना प्रात्यक्षिक रित्या दाखवून स्पष्ट केल्या व नंतर रमजान महिन्याचा उद्देश यावर प्रबोधन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैय्यद सलमान सरांनी मराठी भाषेत केले.

 या कार्यक्रमात आलेल्या आलेल्या बांधवांनी आपल्या प्रतिक्रिया ठेवल्या व नंतर गोड शिकरखुरमाचा आस्वाद घेतला.