Home महाराष्ट्र राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराचे थाटात उद्घाटन

राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराचे थाटात उद्घाटन

89

▪️लाला लजपतराय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजुरा येथे सात दिवसीय शिबिराचे आयोजन.

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.२५मार्च):-कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत लाला लजपतराय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजुरा येथे दिनांक २४ ते ३० मार्च पर्यंत चालणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. यावेळी उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सुरेश ढेंगळे, प्राचार्य, लाला लजपतराय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हे होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. बी. डोंगरावर, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बादल एन.बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था यांची उपस्थिती होती.

प्रमुख अतिथी म्हणून गटनिदेशक आर. एम. रोडे, एस. पी. मद्देलवार, ए.आर.पातर, उप कार्यक्रम अधिकारी रा.से.यो.,ए.जी.आंबोरकर, जी.बी.पिंपळकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. उद्घाटनीय कार्यक्रमानंतर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन विषयी माहिती या विषयावर मार्गदर्शक म्हणून बादल बेले यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची, पर्यावरणाचे नैसर्गिक व मानवनिर्मित असे विभाजन करून त्यांचे महत्व काय, प्लास्टिक चा वापर टाळने, कापडी पिशव्या वापरणे, वृक्षारोपण व संवर्धन, मानवी अन्नसाखळी, पाण्याचा वापर आदीविषयी सविस्तरपणे माहिती देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना प्र. चव्हाण, शिल्पनिदेशक यांनी केले. तर प्रास्ताविक एस.पी.मद्देलवार, प्र. गटनिदेशक यांनी केले. आभार प्राची टाकरखेडे, शिल्पनिदेशक यांनी मानले.

सात दिवस चालणाऱ्या शिबिरात स्वच्छता अभियान तसेच मेंटेनन्स ची कामे, रक्तदान शिबिर, एच.आय.वी. एड्स किशोराअवस्था संबंधी माहिती, इलेक्ट्रिकल व वेल्डिंग, प्लंबिंग मेंटेनन्स ची कामे, नागरिकांचे कर्तव्य व अधिकार, सांस्कृतिक कार्यक्रम, शिबिरार्थ्यांचे मनोगत व अनुभव कथन असे विविध कार्यक्रम सात दिवस चालणाऱ्या शिबिरात केले जाणार आहेत अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना आयोजन समितीच्या माध्यमातून देण्यात आली आहे.