Home महाराष्ट्र रथोत्सवाने साजरी होणार खटाव भैरवनाथ यात्रा 

रथोत्सवाने साजरी होणार खटाव भैरवनाथ यात्रा 

120

✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

खटाव(दि.9एप्रिल):-भैरवनाथ यात्रा चालू वर्षापासून रथोत्सवाने करण्याचा निर्णय खटाव ग्रामस्थांनी घेतला असून शुक्रवार दिनांक दहा रोजी लग्न सोहळा, शनिवार दिनांक अकरा रोजी रथोत्सव असल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली. 

                  खटाव ग्रामदैवत भैरवनाथ देवाची यात्रा दिनांक दहा पासून लग्न सोहळ्याने सुरू होत असून दिनांक अकरा रोजी खटाव मधील पहिला रथोत्सव, दिनांक 12 रोजी कुस्त्यांचे मैदान प्रथम बक्षीस पन्नास हजार रुपये, दिनांक 13 व 14 रोजी भव्य जिल्हास्तरीय डे नाईट पासिंग हॉलीबॉल स्पर्धा प्रथम बक्षीस दहा हजार एक रुपये, द्वितीय पाच हजार एक रुपये, तृतीय तीन हजार एक रुपया चतुर्थ एक हजार एक रुपये अशी अनुक्रमे बक्षिसे असून दिनांक 16 रोजी खास महिलांसाठी पुनम कुडाळकर, व सहकारी काव्या पुणेकर मृणाल लोणकर, भारती पुणेकर रक्षा पुणेकर यांचा तुमच्यासाठी काय पण हा लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती खटाव यात्रा कमिटी ने दिली.