

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.9एप्रिल):-येथील कै सौ शेषाबाई सीताराम मुंढे महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने उन्हाळी-२०२६ परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा दि ०१ एप्रिल ते ०६ मे, 2026 पर्यंत घेण्यात येणार आहे.
या परीक्षेच्या कालावधी दरम्यान महाविद्यालयाचे अंतर्गत दक्षता पथक परीक्षा कॉपी मुक्त व्हावी याची दक्षता घेत आहे. आज रोजी परीक्षा केंद्रास विद्यापीठाच्या भरारी पथकाने भेट दिली. या परीक्षा विद्यापीठाणे ठरवून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून सुरळीतपणे घेण्यासाठी प्राचार्य डॉ बालाजी ढाकणे, परीक्षा प्रमुख डॉ लहु फड, महाविद्यालयातील सर्व कर्मचारी तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक प्रा डॉ राजीव आहेरकर हे प्रयत्न करत आहेत.







