Home अमरावती डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक क्रांतीचे प्रणेते -प्रा.अरुण बुंदेले

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक क्रांतीचे प्रणेते -प्रा.अरुण बुंदेले

135
Oplus_131072

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.15एप्रिल):-स्थानिक दलित-आदिवासी-बहुजन समाजाच्या न्याय्य हक्कासाठी सनदशीर मार्गाने लढा देणाऱ्या उपक्षित समाज महासंघ या अराजकीय सामाजिक संघटना व कै. मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन दि.१४ एप्रिल २०२६ रोजी शिवटेकडी,अमरावती येथे करण्यात आले.

      कार्यक्रमाचे अध्यक्ष लेखक प्राचार्य प्रा.डॉ.एकनाथ गावंडे, प्रमुख अतिथी महासंघाचे अध्यक्ष समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष परिवर्तनवादी साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले,सदानंद फुले, महानायक संघटनाचे संस्थापक व मा.नगरसेवक सुरेश मेश्राम, माळी समाज नऋ‌णानुबंधचे पदाधिकारी गोविंद फसाटे, यशवंत गायकवाड,के.आर. खडसे,डॉ.अनिल खेरडे,डॉ. कबीर वासनकर,सुभाष श्रीखंडे होते.

      अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी भारतरत्न -विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 135 व्या जयंतीनिमित्त हार अर्पण करून अभिवादन केले.

      सर्वप्रथम अभंगकार प्रा. अरुण बुंदेले यांनी स्वतःच्या ” अभंग तरंग ” या काव्य संग्रहातील ” भीमराव ” या अभंगाचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

    याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ व डॉ. प्रवीण बनसोड लिखित ‘ विचारपुष्प’ हे पुस्तक देऊन महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणण्याची गरज- डॉ. एकनाथ गावंडे

                   “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांनी आचरणात आणले पाहिजे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांचेच होते. ते अर्थशास्त्र,कायदा, समाजशास्त्र,राज्यशास्त्र या व इतर अनेक विषयातील तज्ज्ञ होते. ते एक व्यक्ती नव्हते तर एक विचार होते.”असे विचार अध्यक्षपदावरून डॉ.एकनाथ गावंडे यांनी व्यक्त केले व्यक्त केले .”

——

डॉ.आंबेडकरांनी बुद्ध – कबीर – फुले या गुरूंच्या वैचारिकतेतून मानवतावादाचा केला पुरस्कार -प्रा.श्रीकृष्ण बनसोड

             ,” डॉ.आंबेडकरांनी जातीच्या व धर्माच्या नावावर माणसांचे होणारे शोषण- अप्रतिष्ठा व अवमूल्यन नाकारले. त्यांनी भ.गौतम बुद्ध, संत कबीर व महात्मा फुले या तीन गुरूंच्या वैचारिकतेतून मानवतावादाचा पुरस्कार केला. त्यांनी जगाच्या कल्याणासाठी करूणा -मैत्री- समतेची शिकवण देणारा बुद्ध धम्म स्वीकारला आणि विचाराला कृतिप्रवणतेची जोड दिली; म्हणूनच मानवी समाजाचा मूलभूत विचार हा तेजस्वी व चिरस्थायी ठरला.” असे विचार प्रमुख अतिथी प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी व्यक्त केले.

       प्रमुख अतिथी प्रा.अरुण बुंदेले यांनी ,” विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलित समाजाचे नेते नसून भारतातील प्रत्येक उपेक्षित वर्गाचे व स्त्रीचे ते जन्मजात कैवारी होते. जातिव्यवस्था व पितृसत्ताक पद्धतीने शतकानुशतके तिमिरात ढकललेल्या स्त्रीला प्रकाशात आणण्याचे व त्यांना सर्व हक्क देण्याचे कार्य बाबासाहेबांनी कायदेशीर आणि संवैधानिक लढे उभारून दिले.डॉ. आंबेडकर सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते.” असे विचार व्यक्त केले.

बहुजन समाजाने जागृत राहणे आवश्यक-सुरेश मेश्राम

                  माजी नगर सेवक सुरेश मेश्राम यांनी,” मनुवादी प्रवृत्तीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना एका जातीत बंदिस्त केल्याचे सांगून आजही शासन-प्रशासन जातीच्या व धर्माच्या नावावर भांडणं लावत आहेत.म्हणून बहुजन समाजाने जागृत राहणे आवश्यक आहे.”असे विचार व्यक्त केले.”

     सामाजिक कार्यकर्ते मा. सदानंद फुले यांनी ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार ” या विषयावर विचार व्यक्त केले.

         विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संजय आठवले, राजू मेश्राम,नारायण मानकर, हंसराज वाळदे,सुधीर बोके, अनिल माहोरे,मनोज गुल्हाने, देविदास हिवराळे, तुळशिदास सावरकर, सुनील वाघमारे,मो. काजी,वसंत ठवरे,देविदास बंदरे,राजेंद्र मेश्राम, शेखर ठके प्रल्हाद मेश्राम,गौरव सावरकर, सिंधु दिवे,शिवाणी गंभीर, लावण्या सावरकर सह शिव – फुले – शाहू -आंबेडकर चळवळीतील अनेक समता सैनिकांनी अभिवादन केले. सुरेश मेश्राम यांनी संचलन तरजी. जी. फसाटे यांनी आभार मानले.डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य आनंदोत्सव साजरा करून मिठाईचे वाटप करण्यात आले.