

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.25एप्रिल):-तालुक्यातील पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.एप्रिल महिन्याचे धान्य वितरण न झाल्याने अनेक कुटुंबे धान्याच्या प्रतीक्षेत असून,त्यांच्या रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.सरकारकडून नियमित धान्य वितरणाचे आदेश असतानाही स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.अनेक लाभार्थ्यांनी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली,मात्र समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार आहे.
लाभार्थ्यांचे म्हणणे आहे की,जर तीन महिन्यांचे धान्य एकत्रित देणे शक्य नसेल,तर किमान महिन्याला महिन्याचे धान्य वेळेवर वितरित करावे.उशिरा मिळणाऱ्या धान्यामुळे कुटुंबांचे नियोजन कोलमडत असून आर्थिक ताण वाढत आहे.या प्रकरणी संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून धान्य वितरण सुरळीत करावे,अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.







