Home महाराष्ट्र फुले दांपत्य यांची विचारधारा आत्मसात करून आपले जीवन सार्थकी लावावे — ह....

फुले दांपत्य यांची विचारधारा आत्मसात करून आपले जीवन सार्थकी लावावे — ह. भ. प.प्रमोद शिंदे महाराज

32

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.29एप्रिल):-फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन चे वतीने महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्म शताब्दी निमित्त ज्येष्ठ समाजसेवीका कै.सखुबाई चंदर कुदळे यांच्या प्रथम स्मृतिदिन सत्यशोधक पद्धतीने साजरा करण्यात आला.या प्रसंगी सुप्रसिध्द कीर्तनकार ह. भ. प.प्रमोद शिंदे महाराज आणि गायनाचर्य विद्याताई शिंदे यांचे फुले दांपत्य यांचे जीवनावर कीर्तन आयोजित केले असता त्यांना श्यामराव वाघमोडे महाराज,बापू महाराज,गोरख महाराज,दादा महाराज,राजू महाराज आणि कांतिलाल महाराज यांनी साथ दिल्याने अतिशय सुमधुर आवाजात प्रबोधन कार्यक्रम दि.27एप्रिल 26 रोजी 10 ते 12 दगडवाडी,निमसाखर येथे राहते घरी संपन्न झाला.

याप्रसंगी प्रमोद शिंदे महाराज म्हणाले की आजच्या कार्यक्रमात महिला जास्त सहभागी झालेत ते फुले दांपत्य यांनी महिलाना चूल मूल मधून बाहेर काढून प्रथम ज्ञानदान सुरू केले ही पुण्याई आपण विसरता कामा नये.आज महिला ग्रामपंचायत सदस्य पासून पंतप्रधान,राष्ट्रपती आणि विविध क्षेत्रात कामगिरी करतायत हे फुले दांपत्य यांनी शिक्षण सुरू केल्यामुळेच हा त्यांचा त्याग खूप मोठा असून सोबत त्यांनी अंधश्रद्धा ,कर्मकांड,मूर्तिपूजा यातून बाहेर पडून सत्यशोधक पद्धतीने कार्य करण्यासाठी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक आजारी असताना डाव्या हाताने लिहून पूर्ण केला आहे. त्यामुळे आपण त्यांची विचारधारा आत्मसात करून आपले जीवन सार्थकी लावावे असे म्हणत आई वडिलांची जिवंतपणी सेवा करून पुण्य मिळवावे असे देखील म्हटले. पुढे त्यांनी सांगितले की संत सावता महाराज यांनी श्रमामध्ये देव पाहिला याबाबतचे सुमधुर आवाजात कांदा मुळा भाजी सारखे सावता सागर प्रेमाचे आगर असे अनेक अभंग गाऊन प्रबोधन केले.

कार्यक्रमाचे सुरुवातीला महात्मा फुले यांच्या पुतळ्यास शिंदे महाराज यांचे तर सावित्रीमाई फुले यांचे पुतळ्यास सत्यशोधिका आशा ढोक आणि सखुबाई कुदळे यांच्या फोटोस हार अर्पण करण्यात आला.

यावेळी संस्थेचे वतीने शिंदे महाराज दाम्पत्य यांनी कीर्तन रुपी सेवेतून फुले दांपत्य यांचे जीवनकार्य सांगितले म्हणून संस्थेचे वतीने विवाह जमवून सत्यशोधक विवाह 21.5.2019 रोजी लावला ती सत्यशोधिका प्रियांका कुदळे आणि सत्यशोधक उमेश कचरे यांचे शुभहस्ते फुले दांपत्य फोटो फ्रेम आणि धोंडीराम ढगे गुरुजी हस्ते एकत्रित शाल पांघरून नारळ देऊन सन्मान करण्यात आला.

तर सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले यांच्या 200 वी जयंती निमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम 11 एप्रिल 27 पर्यंत आजोजन करून घरातील सर्व कार्य सत्यशोधक पद्धतीने करावे असे आवाहन करीत महात्मा फुले रचित सत्याचा अखंड सर्वांकडून वधवून घेतला.

कार्यक्रमाचे आयोजन सोपान व विठ्ठल चंदर कुदळे आणि सौ.मंगल राऊत यांनी आयोजित केला तर पोलिस निरीक्षक नवनाथ सोपान कुदळे यांनी सर्वांचे आभार मानले.