

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.29एप्रिल):-फलटण नगर परिषदे कडून अनधिकृत नळ कनेक्शन व सार्वजनिक नळ कनेक्शन बंद ची कारवाई फलटण शहरात चालु असुन या कारवाई मध्ये सार्वजनिक नळ कनेक्शन बंद केल्या मुळे फलटण शहरातील प्राणी, पक्षी, व इतर जीव यांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम झाला असून शहरातील नागरिक असो किंवा पक्षी, प्राणी, असो यांची मुलभुत गरज पाणी असुन ते प्रमुख्याने सार्वजनिक नळ व पाणवठ्यावर उपलब्ध होते.
परंतु फलटण नगर परिषदेने घेतलेला सार्वजनिक नळ कनेक्शन बंद मुळे शहरातील अनेक पक्षी, प्राणी पाण्या वाचून तळमळत प्राण सोडत असल्याचे निदर्शनास आले असुन . आपण हि कारवाई तोरीत थांबवावी व वन्य जीव संरक्षण कायदा 1972 चे तंतोतंत पालन करावे व अधी पक्षी, प्राणी, तात्पुरते निवासी यांची पाण्याची, पाणवठ्याची सोय करावी . मग हा निर्णय घ्यावा. अशी भीम आर्मी संघटनेने मागणी केली असून जेने करून पाण्या वाचून कोणताही सजीवाचा जीव जाणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा भीम आर्मी संघटना त्रिव स्वरूपाचे आंदोलन करेल असे संघटने कडून सांगण्यात आले .
अजित संभाजी मोरे, , सुनील पवार, तुषार जाधव, तेजस भोसले,







