Home Breaking News खुन्याच्या गुन्ह्यातील फरार मारेकरी अडीच वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात नांदेडमधून अटक

खुन्याच्या गुन्ह्यातील फरार मारेकरी अडीच वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात नांदेडमधून अटक

20

✒️प्रतिनिधी डोंबिवली(रविंद्र जाधव कोतापकर)

डोंबिवली(दि.30एप्रिल):-खुन्याच्या गुन्ह्यातील फरार मारेकरी अडीच वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. याला डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी नांदेडमधून अटक करून बेड्या ठोकल्या. या गुन्ह्याखाली दोन मारेकऱ्यांना पोलिसांनी आधीच अटक केली होती. त्याचा साथीदार पकडल्या जाण्याच्या भीतीने फरार झाला होता.

          पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपक साहेबराव करकडे ( २८,रा. परभणी ) असे अटका केलेल्या साथीदाराचे नाव आहे. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा, स्मशानभूमी पाठीमागे, खाडीकिनारी एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाच्या डोक्यावर व कपाळावर जखमा असल्याने ही हत्या आहे असा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी तपास पथक तयार करून मारेकऱ्यांचा शोध सुरु केला.खून्यातील मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस धागादोरा शोधत होती. अखेर पोलिसांच्या तपासाला यश आले आणि या गुन्हातील दोन मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक करून गजाजाड केले होते.

विलन विष्णू ठावरे ( ४१, रा. उमेशनगर )व योगेश निमाप्पा डोंगरे (४२, मोठागाव, डोंबिवली पश्चिम ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांचा साथीदार दीपक हा फरार होता. पोलीस दीपकचा कसोशीने शोध घेत होते. अखेर दीपक हा नांदेश येथे लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. २४ एप्रिल २०२६ रोजी पोलिसांनी नांदेड येथे सापळा रचला. दीपकला त्याठिकाणी पकडून अटक केली. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातुन ही हत्या झाली होती.