

▪️साकोलीत “व्हॉईस ऑफ मीडिया” नवनियुक्त चमुंचा सत्कार ; व्ही एस एफ समुहाचे प्रथमच आयोजन
✒️किशोर बावणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
साकोली(दि.5मे):-“पत्रकारांनी सदैव निर्भिडताच ठेवावी आणि प्रत्येक समस्यांवर वेळोवेळी धावून जाणा-या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभांचा सत्कार व्हायलाच हवा” असे प्रतिपादन साकोली सेंदूरवाफा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष देवश्री मनिष कापगते यांनी केले. ते काल ( रवि. ०३ मे ) ला नगरपरिषद सभागृहात ( व्हीएसएफ ) व्हीआयपी ग्रुप, साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशन आयोजित “व्हॉईस ऑफ मीडिया” नवनियुक्त साकोली तालुका कार्यकारिणींचा सत्कार व अभिनंदन सोहळ्याला अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या.
साकोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच “पत्रकारांचा सत्कार” या अभूतपूर्व सोहळ्याला मंचावर अध्यक्ष देवश्री कापगते नगराध्यक्ष, प्रमुख अतिथी न. प. उपाध्यक्ष रोहिणी मुंगूलमारे, नगरसेविका स्मिता सिडाम, पत्रकार डी. जी. रंगारी, माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते हे प्रामुख्याने उपस्थित होते. येथे अतिथींकडून व्हॉईस ऑफ मीडिया चमु साकोलीचे सत्कारमूर्तीत नवनियुक्त साकोली ता. अध्यक्ष आशिष चेडगे, उपाध्यक्ष रवि भोंगाने, सचिव किशोर रंगारी, सहसचिव शाहेद कुरैशी, कोषाध्यक्ष मनिषा काशिवार, सदस्यगण ऋग्वेद येवले, राशिद कुरैशी, किशोर बावणे, अयुब खान, सुनिल जगिया, ताराचंद कापगते, यशवंत कापगते, जिल्हा कार्यकारिणीचे डी. जी. रंगारी, सदस्यगण किशोर गडकरी, लाखनीचे मदन कमाने तसेच नगरपरिषद स्वच्छता कर्मचारी सुरेश मेश्राम यांना “व्हीएसएफ” समुहाचे मानचिन्ह देऊन सत्कार व स्वागत, अभिनंदन करण्यात आले. आहे. येथे संचालन प्रा. हरीशचंद्र सोनवाने यांनी तर प्रास्ताविक लाखांदूर न्यायालयाचे रणधीर कापगते यांनी केले. तर आभार करतांना अनिल कापगते यांनी म्हटले की, जिल्हा अध्यक्ष शशिकांत भोयर यांनी अगदी निर्भिड चमुची साकोलीसाठी निवड करून समोर नक्कीच नव्या विकासाचा साकोली सेंदूरवाफा शहरात बदल घडणार आहे असे वक्तव्य केले. याप्रसंगी येथे व्हॉईस ऑफ मीडियाचे साकोली तालुक्यातील प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया व सोशल मिडीयाचे पत्रकार उपस्थित झाले होते.
साकोलीच्या कारकिर्दीत मे अभूतपूर्व आयोजन “व्हीएसएफ” म्हणजे व्हीआयपी ग्रुप साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशनचे अनिल कापगते, ॲड मनिष कापगते, अंकीत कापगते, प्रविण कांबळे व सहकारी सदस्यगण हरीशचंद्र सोनवाने, चंद्रशेखर कापगते, संतोष नारनवरे, गणेश बोरकर, महेश पोगळे, मुकेश पंचभाई, मनिष झिंगरे, रूपचंद कापगते, सिताराम मौजे, दिगंबर सुर्यवंशी व संपूर्ण “व्ही एस एफ” समुह साकोली सेंदूरवाफा शहर यांनी हा सोहळा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.







