

✒️कुणाल श्रवले(उमरखेड तालुका प्रतिनिधी)
उमरखेड(दि.5मे):- जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची वैशाखी पौर्णिमा (बुद्ध पौर्णिमा), महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन असे त्रिवेणी औचित्य साधून उमरखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहार येथे विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून झाली. त्यानंतर भदंत कीर्ती बोधी, महाउपासक शंकरराव दिवेकर, सौ. ज्योतीताई दीपक इंगोले आणि दीपक इंगोले यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रमामाता महिला मंडळाच्या सदस्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ध्वजगीत सादर केले.
बुद्धांच्या जीवनात तिन्ही पौर्णिमांचे महत्त्व – भंते कीर्ती बोधी
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भदंत कीर्ती बोधी म्हणाले की, “भगवान बुद्धांच्या जीवनात वैशाख पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बुद्धांचा जन्म, त्यांना झालेले ज्ञानार्जन आणि महापरिनिर्वाण या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेलाच घडल्या आहेत, त्यामुळे हा दिवस जागतिक शांततेचा संदेश देणारा दिवस आहे.”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सम्यक बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन तुषार पाईकराव यांनी केले. या सोहळ्याला रमामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा उषा इंगोले, भारती केंदेकर, उज्वला धबाले, आनंदाबाई दिवेकर, भारताबाई दिवेकर, शांताबाई दिवेकर, जानकाबाई इंगोले, आनंद दिवेकर, सुमेध दवणे यांच्यासह प्रभागातील अनेक उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.







