Home महाराष्ट्र शेतकरी पैसा मोजतो, काम मोजत नाही!

शेतकरी पैसा मोजतो, काम मोजत नाही!

25

शेतकऱ्यांसाठी कोणीही लढत नाहीत. जे लढतात त्यांची अवस्था बच्चू कडू सारखी होते.

शरद जोशी खूप अभ्यास करून लढले. याच शेतकऱ्यांनी निवडणुकीत तोंडघशी पाडले.

राजू शेट्टी खूप अभ्यासू माणूस.त्यांनी शेतकऱ्यांसाठी हयात घालवली. तरीही शेतकऱ्यांनी त्यांना निवडणुकीत नाकारले.

आता बच्चू कडू शिवसेनेत गेले. असे मलाही चुकीचे वाटते. पण बच्चू कडू साठी शेतकऱ्यांसाठी खूप खूप लढले. मी पाहिले. वर्धा नागपूर रस्ता अडवला. वरून पाऊस. खाली हायकोर्टाचा आदेश. रस्ता रिकामा करा. पोलिसांची दंडेली. शेवटी कर्जमाफी चा करार झाला. तेंव्हा पण बच्चू कडू वर संशय घेतला. पण करार झाला. आता तो करार पाळला तर प्रत्येक शेतकऱ्याला दिड दोन लाखाचे कर्ज माफ होणार आहे.

फायदा शेतकऱ्यांचा आणि पोलीस, कोर्ट आणि सजा बच्चू कडू यांना.

मला वाटले होते कर्जमाफी चा करार झाल्यानंतर शेतकरी बच्चू कडू यांचा सत्कार सन्मान करतील.पण नाही.शेतकरी गेले भाजप सेनेच्या मंडपात जेवायला.

  शेतकऱ्यांसाठी लढणारा माणूस शेतकरी गमवत आहेत. आधी शरद जोशी नंतर राजू शेट्टी आणि आता बच्चू कडू. जो शेतकरी इंग्रजी अमदानित स्वावलंबी होता तो आता आत्महत्या करीत आहे. कारण शेतकरी मदत करणाऱ्यांची चिंता करीत नाही. पण जो मताचे हजार पंधराशे देतो त्याचा गुलाम होतो. त्याची बायको पंदराशे घेऊन मत विकते. तेंव्हा कोणताही शेतकरी बायकोला सांगत नाही कि, पैसे घेऊ नको.घेतले तरीही त्याला मत विकू नको.

माझा अनुभव आहे, शेतकरी फक्त मताचा पैसा मोजतो. मदतीचे मोल मोजत नाही. कामाचे मोल कधीच मोजत नाही.

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२