

✒️कळंब(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कळंब(दि.5मे):-पुरूषोत्तम संबोधी लिखित “सिध्दार्थाचा हंस” या बालकविता संग्रहाचे प्रकाशन बुध्द जयंतीच्या दिवशी अगदी हर्षोल्लोसात संपन्न झाले. हा कार्यक्रम कळंब, जि.यवतमाळ येथील तथागत बुध्द विहारात आयोजित करण्यात आला. हा बालकविता संग्रह असल्यामुळे बाल कुमारांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले; ही अनन्यसाधारण महत्वपूर्ण घटना आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक पुनेश्वर चांदवे होते.
विहारातील उपस्थित जनसमुदायासमोर आपले विचार व्यक्त करतांना ते म्हणाले, या पुस्तकातील कविता कुमार सिध्दार्थ आणि बुध्दकालीन ऐतिहासिक प्रसंगावर आधारित असून अतिशय सोप्या शब्दांत आणि ओघवत्या गेय शैलीत लिहिल्या आहेत, त्यामुळे त्या लहान मोठ्या सगळ्याच मंडळींना निश्चितच आवडतील. या प्रसंगी श्रध्दा भगत यांनी आभार व्यक्त केले.







