

✒️घुग्घुस(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
घुग्घुस(दि.5मे):-येथील आ.किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात ४ मे २०२६ रोजी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार, भारतीय जनता पक्षाने (भाजपा) पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजय मिळवला आहे। अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण करत भाजपाने बंगालमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलवले असून, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचा पराभव केला आहे।पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयाचे मुख्य मुद्दे:बंगालमध्ये सत्तांतर: बंगालच्या जनतेने विकास, स्थिरता आणि शांततेसाठी मतदान केले आहे।मोदी-शाह रणनीती: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रणनीती या विजयात महत्त्वाची ठरली आहे।मुख्यमंत्रीपदाची चर्चा: भाजपाच्या विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण, याची चर्चा सुरू झाली असून, सुवेंदू अधिकारी आणि दिलीप घोष यांच्यासह ४ नावे आघाडीवर आहेत।इतर राज्यांमधील कामगिरी: पश्चिम बंगालसोबतच भाजपाने आसाममध्ये हॅट्ट्रिक साधली असून, पुद्दुचेरीमध्येही ऐतिहासिक विजय मिळवला आहे।
आ.किशोर जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात आतिषबाजी तसेच नारे देण्यात आले.कार्यकर्त्या मध्ये मिठाई वाटप करीत नागरिकांत उत्साहात म्हणून जोरदारात विजयाची जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच आसाम व पुडुचेरी येथे भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल जल्लोष साजरा करण्यासाठी उपस्थित आले. याप्रसंगी भाजप गटनेत्या व नगरसेविका सौ.मीना चांद मोरपाका,महिला अध्यक्षा सौ. सुचिता लुटे,माजी.ग्रा.पं.सदस्य सौ. पूजा दुर्गम ,सौ.नीतू जसवाल,सौ. माया मांडवकर,सौ.संध्या जगताप ,श्री.विनोदजी खेवलें, माजी.सरपंच श्री.संतोषजी नुने ,श्री. सूर्यवंशी ,श्री.अनिल बाम ,श्री.लखन हिकरे, श्री.संजयजी भोंगळे,श्री.साजन गोहाणे ,श्री.इमरान खान,श्री.स्वप्नील वाढई ,श्री.बबलू सातपुते,श्री.राजूजी नसर,श्री.रमणजी तंद्रा ,श्री.श्रीकांत मिसाला,श्री महेंद्रजी बाघ श्री निरीक्षणजी तांड्रा,श्री.चंदूजी पलावर ,श्री.जतिन कलाकुल्ला श्री.गणेशजी पिंपळकर ,श्री. नंदकिशोरजी यादव ,श्री. सुनील राम,श्री.संजय पाखले ,श्री.मुन्ना लोढे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते,नागरिक उपस्थित होते.







