Home महाराष्ट्र १७ व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सुरेश बनसोडे यांची निवड

१७ व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सुरेश बनसोडे यांची निवड

52

✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

 अहिल्यानगर(दि.12मे):- शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने येत्या २३ व २४ मे रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. 

          आमदार संग्रामभैया जगताप यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत सदर निवड जाहीर करण्यात आली. यावेळी शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, संस्थापक, सचिव सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत आदी उपस्थित होते.

         साहित्यिक प्रा.डॉ.संदीप सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली जाधव लॉन्स, कल्याण रोड, अहिल्यानगर येथे हे संमेलन होणार आहे. 

      सुरेश बनसोडे हे शिव,शाहू, फुले आंबेडकरी विचारांच्या चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते आहेत. आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माळीवाडा येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणी कामी त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.अनेक महापुरुषांच्या जयंती,पुण्यतिथी निमित्ताने विविध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजना मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

स्वागताध्यक्ष निवडीसाठी आयोजित बैठकीस शब्दगंध चे राज्य कार्यकारणी सदस्य सुभाष सोनवणे, प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर, प्रा.डॉ. अनिल गर्जे, बबनराव गिरी, प्रशांत सूर्यवंशी, मकरंद घोडके, बाळासाहेब देशमुख, प्रा.हर्षल आगळे, प्रा. एल.बी.जाधव, शर्मिला गोसावी, स्वाती ठुबे,सुरेखा घोलप, विशाल तागड,दत्तू साळवे इत्यादी उपस्थित होते. 

शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुरेश बनसोडे यांचा शब्दगंध चे कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे यांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ, शब्दगंध स्मरणिका व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. 

१७ वे शब्दगंध साहित्य संमेलन न भुतो न भविष्यती अश्या दिमाखदार पद्धतीने करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करील, सर्व मान्यवर व नवोदित साहित्यिकांना सहभागी करून घेऊन हे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.अशी ग्वाही सुरेश बनसोडे यांनी दिली.

यावेळी बैठकीचे प्रास्ताविक सुभाष सोनवणे यांनी केले, भगवान राऊत यांनी परिचय करून दिला, शेवटी प्रा. डॉ.अनिल गर्जे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव स्वाती ठुबे यांनी केले.