

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.12जून):-येथील डॉ.के.पी.गारोळे एज्युकेशन सेंटरमध्ये (दि.११ जून गुरुवार)रोजी डॉक्टर्स असोसिएशन गंगाखेड यांच्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमास शहरातील डॉक्टर सह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाखेड येथील प्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ,डॉ.के.पी.गारोळे एज्युकेशन सेंटरचे अध्यक्ष तथा डॉक्टर्स असोसिएशन गंगाखेडचे अध्यक्ष डॉ.किशन गारोळे हे होते.यावेळी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नंदकुमार भरड,संदीप कोटलवार,तसेच पत्रकार मकरंद चिनके यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबदल गौरव करण्यात आला.
शहरामध्ये नव्याने लॅप्रोस्कोपी सर्जरी हॉस्पिटल सेवा सुरू केल्याबद्दल डॉ.भगवान कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला.केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी सदस्य प्रदीप गुंडाळे,डॉ.ज्ञानोबा तुरनर,डॉ.मुंजा रानगिरे यांना वाढदिवसानिमित्य शुभेच्छा देण्यात आल्या.अध्यक्षीय समारोपामध्ये डॉ.किशन गारोळे यांनी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.एकीच्या बळावर उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून संघटित शक्तीचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमास डॉ.के. पी.गारोळे एज्युकेशन सेंटरच्या संचालिका व प्राचार्या किरण गारोळे यांचीही विशेष उपस्थिती लाभली.यावेळी डॉ.मनिष बियाणी,डॉ. किशोर कुगणे,डॉ.फेरोज शेख,डॉ.अशोक हनवते,डॉ.तोष्णवाल,डॉ.ज्ञानोबा होळंबे,डॉ.मल्लूरवार,डॉ.रितेश वट्टमवार,डॉ.बाळासाहेब मानकर,डॉ. योगेश सूर्यवंशी,डॉ.कलीम खान,डॉ. श्रीहरी टाले,डॉ.सोलंकर यांच्यासह डॉक्टर्स असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तुकाराम हुरगुळे यांनी केले,तर आभार डॉ.किशोर कुगणे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी डॉ.के.पी.गारोळे एज्युकेशन सेंटरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.







