Home अमरावती विदर्भ फेस ऑफ द इयर या भव्य फॅशन शो चे अमरावती मध्ये...

विदर्भ फेस ऑफ द इयर या भव्य फॅशन शो चे अमरावती मध्ये आयोजन 

47

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

 अमरावती(दि.14जून):-पी बी फिल्म प्रोडक्शन प्रेजेंट विदर्भ फेस ऑफ द इयर या भव्य फॅशन शो चे अमरावती मध्ये 23 ऑगस्ट रोजी अमरावती मध्ये आयोजन करण्यात आले आहे. या फॅशन शो मध्ये संपूर्ण महाराष्ट्र मधून स्पर्धक सहभागी होणार असून केवळ 40 स्पर्धेकांना सहभागी होता येणारं आहे. त्यामध्ये किड्स,टीन मिस, मिस्टर, सौभाग्यवती या सर्वांचा समावेश असणार आहे.

आज पर्यंत झाला नसेल अश्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा फॅशन शो होणार आहे. तसेचं याठिकाणी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या केवळ 30 लोकांना समाज प्रतिबिंब बहुद्देशीय संस्थेच्या वतीने कर्तृत्वभूषण राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणारं आहे. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भूषण सरदार आहेत.अधिक माहितीसाठी ९४२०६२१९९४ वर संपर्क करावा असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.