Home चंद्रपूर पुरस्कार सोहळ्याच्या भित्तीपत्रकाचे विधी व न्याय मंत्र्याच्या हस्ते अनावरण 

पुरस्कार सोहळ्याच्या भित्तीपत्रकाचे विधी व न्याय मंत्र्याच्या हस्ते अनावरण 

143

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.18जानेवारी):- वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान चे वतीने दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी चिमूर येथील मिलन सभागृहात आयोजित चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुद्धविहार स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने प्रकाशित भित्तीपत्रकाचे अनावरण आज नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे विधी व न्याय राज्यमंत्री ना. ऍड.आशिष जैस्वाल यांचे हस्ते करण्यात आले या प्रसंगी वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष ऍड. भूपेश पाटील, पारशिवनी नगर पंचायत चे उप नगराध्यक्ष दीपक शिवरकर, नगरसेवक सौरभ वाळके तसेच पारशिवनी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश डोमकी, दीपक सावरकर व राजू वाळके हे उपस्थित होते. 

वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान या संस्थेने चिमूर तालुक्यातील बुद्ध विहारांसाठी चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुद्ध विहार स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त बुद्ध विहारांचा पारितोषिक वितरण समारंभ राज्याचे विधी व न्याय राज्यमंत्री ऍड.आशिष जैस्वाल यांचे विशेष उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिप्रेत असणारी धम्म चळवळीची केंद्रे व्हावीत,या विहारांमधून सामाजिक चळवळीचे कार्य सातत्याने होत रहावे या उद्देश्याने चिमूर तालुक्यातील बुद्धविहारांकरिता चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुद्धविहार स्पर्धेचे आयोजन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान या संस्थेकडून करण्यात आले आहे.

 या समारंभाला विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे अर्थ,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,कामगार राज्यमंत्री ना. ऍड.आशिष जैस्वाल उपस्थित राहणार आहेत.समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत,माजी मंत्री आमदार इंजि.राजकुमार बडोले, आमदार कीर्तिकुमार भांगडिया,आमदार संजय मेश्राम,नगराध्यक्षा गीता लिंगायत उपस्थित राहणार आहेत अशी माहिती वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड.भूपेश पाटील,सचिव सुरेश डांगे,सदस्य हरी मेश्राम,रामदास कामडी,विरेंद्र बन्सोड,सुधाकर गणवीर,प्रियानंद गेडाम,नितीन पाटील यांनी दिली आहे.