Home महाराष्ट्र ग्रीन नेचर फाउंडेशन तर्फे लाखनी नेचर पार्कवर पर्यावरणस्नेही पतंग स्पर्धा

ग्रीन नेचर फाउंडेशन तर्फे लाखनी नेचर पार्कवर पर्यावरणस्नेही पतंग स्पर्धा

197

▪️विद्यार्थ्यांनी दिला नायलॉन मांजा टाळा,पशुपक्ष्यांना वाचवाचा संदेश

▪️महिलांना वृक्षवाणाचे वाटप

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.18जानेवारी):-लाखनी येथील ग्रीन नेचर फाउंडेशन अर्थात ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पर्यावरणस्नेही मकरसंक्रांत सण साजरी करण्यात आली. यामध्ये विशेषता नायलॉन मांजाचे दुष्परिणाम सांगणारी पर्यावरणस्नेही पतंग स्पर्धाचे आयोजन लाखनी बसस्थानकावरील नेचर पार्कवर करण्यात आले.त्याचबरोबर पर्यावरणस्नेही मकरसंक्रांतिच्या निमित्ताने महिलांना वृक्षवाण म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण शोभिवंत पुष्परोपे ग्रीन नेचर फाउंडेशनच्या कार्यालयात महिलांना देण्यात आले.

 नेचर पार्कवरील पर्यावरणस्नेही पतंग बनवा स्पर्धेत ताजुश शरिया कोचिंग क्लासेसचे विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पक्षी व प्राणी आकारात व नायलॉन मांजा दुष्परिणाम यावर आधारित घोषवाक्य लिहून पतंग सजावट केले. यावेळी प्रा.अशोक गायधने सरांनी नायलॉन मांज्यामुळे भारतात दरवर्षी जीवित हानी होणाऱ्या पक्षी,प्राणी व मानवी हानीची सांख्यिकी माहिती दिली. या कार्यक्रमाला ग्रीन नेचर फाउंडेशनचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक भैय्याजी बावनकुळे,अशोक वैद्य व अशोक नंदेश्वर तसेच ताजूश शरिया कोचिंग क्लासेसचे संचालिका मिनाझ मोटलानी व प्रा. डॉ.अर्चना गायधने यांनी सुद्धा समयोचित मार्गदर्शन केले.यावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी लाखनी नेचर पार्कवर नायलॉन मांजा टाळा व पशुपक्ष्यांना वाचवा असा उद्घोष करून प्रवाशांना व नागरिकांना पर्यावरणस्नेही मकरसंक्रांतीचा संदेश दिला. इकोफ्रेंडली पतंग सजावट स्पर्धेत प्रायमरी गटात प्रथम क्रमांक सहेरिश सैय्यद व सुमती बजाज हिला प्राप्त झाला तर द्वितीय क्रमांक नायरा पाटील व आल्फिया दयाला यांना तर तृतीय क्रमांक लावण्या निर्वाण व उमैर छवारे यांना तर प्रोत्साहनपर क्रमांक जैनब छवारे, इनाया छवारे व आराध्या आगलावे यांना प्राप्त झाला तर सहभागपर क्रमांक अभिधा थोटे हिला मिळाला.

मिडलस्कुल गटात प्रथम क्रमांक निराली वंजारी व जान्हवी निर्वाण यांना तर द्वितीय क्रमांक कनक गुरुनानी व अश्मिरा आकबानी यांना तर तृतीय क्रमांक काव्या धंधुकिया व अन्विक्षा थोटे यांना तर प्रोत्साहनपर क्रमांक मिताली गायधनी व आरोही कावळे यांना प्राप्त झाला. स्पर्धेचे परीक्षण प्रा.डॉ.अर्चना गायधने व मिनाझ मोटलानी यांनी केले.

  मकरसंक्रांत निमित्ताने वृक्षवाण म्हणून ग्रीन नेचर फाउंडेशन व ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब तर्फे अनेक महिलाना पुष्परोपे प्रा. डॉ अर्चना गायधने यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यामध्ये पुष्पा भुरे, सुमन आगलावे, किर्ती आगलावे,शालिनी थोटे, पुष्पा रोडे, भांडारकर मॅडम, सुन्ने मॅडम, पल्लवी पाटील, ज्योती वैद्य, ममता गायधने, जयश्री नंदेश्वर,प्रा.स्नेहलता बोरकर, योगिनी गभने इत्यादी अनेक महिलांना पुष्परोपे वृक्षवाण म्हणून देण्यात आले