Home महाराष्ट्र मांडवा गावाजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी

मांडवा गावाजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी

113

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.15जानेवारी):- ते हिंगोली या राज्य महामार्गावर येत असलेल्या मांडवा गावाजवळ गतीरोधक व रस्ताच्या दुतर्फा नालीच्या बाधकामाच्या वेळेस गावात जाणारे मुख्य रस्ते खोदण्यात आले. ते रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे. या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाना निवेदन देण्यात आले आहेत.

 मांडवा गाव हे महामार्गाच्या दुतर्फा असुन वरच्या बाजुने अंगणवाडी,ग्रामपंचायत कार्यालय, मंदिरे, वस्ती व दुकाने असल्यामुळे लहान मुलासह ग्रामस्थांची सतत ये-जा असते. 

 मांडवा गावाजवळ रस्त्यावर वळण त्यामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनामुळे अनेक अपघात झाले आहेत. हे लक्षात घेता ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी ५ ऑगस्ट२०२५ सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्यावर तात्काळ गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी केली. तसेच ग्रामपंचायत व ग्रामस्थाच्या वतीने पण तात्काळ गतिरोधक बसविण्यात यावा तसेच नव्यानेच बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या दुतर्फा नालीच्या बांधकामामुळे गावात जाणारे मुख्य रस्ते करण्यात खोदण्यात आले. त्यामुळे वाहनधारकांना तसेच शेतकऱ्यांना आपला माल नेण्यासाठी या रस्त्यावर मोठी कसरत करावी लागत आहे.