

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.15जानेवारी):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव (औरंगाबाद)संभाजी महाराज नगर विघापीठाला मिळावे यासाठी बहुजन समाजा कडून तब्बल 17 वर्षे संघर्ष करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार करण्यात आले .
राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने 26 जुलै 1978 ला ठराव मंजूर करणात आले होते . परंतु या ठरावाला विरोध झाल्याने अनेक वर्षे हा नामविस्तार प्रश्न प्रलंबित होता त्या साठी बहुजन समाजा कडून अनेक वेळा मोर्चे, अंदोलने करण्यात आली होती. या प्रसंगी काहींना आपला जीव हि गमवावा लागला होता ,त्या नंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव 14 जानेवारी 1994 रोजी विघापिठाला देण्यात आले नामविस्तार झाले .या दिनाचे औचित्य, आभिमान, साधुन भीम आर्मी संघटने कडून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले, व नामविस्तार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या . तसेच मकर संक्रांत तीच्या हि समाज बांधवांना देण्यात आले .
त्या वेळी अजित संभाजी मोरे, लक्षण काकडे, सुनील पवार, आदेश कांबळे, बंडु काकडे उपस्थित होते..







