Home महाराष्ट्र म्हसवे गटात रिपाईची एल्गार बैठक संपन्न

म्हसवे गटात रिपाईची एल्गार बैठक संपन्न

102

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100      

म्हसवड(सातारा)(दि.17जानेवारी):- येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्हा परिषदेची एक व पंचायत समिती सदस्यपदाच्या पाच जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ ) लढवन्याच्या तयारीत असून आंबेडकरी संघटनेला जावली तालुक्यात आपले अस्तित्व अबाधित राखायचे असेल तर निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन रिपाई पक्षाची ताकद दाखवून देऊन बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासनकर्ती जमात होण्यासाठी प्रत्येक गटात आंबेडकरी संघटनेची बैठक घेणार असून पहिली बैठक म्हसवे गटात संपन्न झाली.

     २०१४ सालापासून रिपाई ची युती ही भाजपा बरोबर असून प्रत्येक निवडणुकीत रिपाईने भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सहकार्य केलेले आहे , गेले तीस वर्ष आंबेडकरी संघटनेला जावली पंचायत समितीमध्ये एकही संधी मिळाली नाही त्यामुळे एकूण जिल्हा परिषदेच्या तीन व पंचायत समितीच्या सहा जागांपैकी कुठलीही एक जागा रिपाईला भाजपाने द्यावी यासाठी जावली तालुक्यात प्रत्येक गटात आंबेडकरी संघटना बैठक घेत असून कुठलीही एक जागा मिळाली तर आंबेडकरी संघटना भाजपाला इतर सर्व ठिकाणी सहकार्य करणार अशा पद्धतीचा ठराव रिपाईच्या म्हसवे गटातील मीटिंगमध्ये घेण्यात आला प्रत्येक निवडणुकीत रिपाई भाजपाला मतदान करत असून भाजपाने सुद्धा शासकीय कमिट्या ,जिल्हा नियोजन व इतर कमिटीवर रिपाईच्या पदाधिकाऱ्यांना सन्मान दिला पाहिजे .

       आंबेडकरी संघटन जावली तालुक्यात जिवंत ठेवायचे असेल तर चळवळीच्या कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे त्यासाठी त्यांना सत्ते मध्ये सहभाग करून घेतले पाहिजे तरच आंबेडकरी संघटनेचे अस्तित्व तालुक्यात जिवंत राहील .

     जावली तालुक्यातील आंबेडकरी बुद्धिष्ट समाज हा जागृत झाला असून आंबेडकरी समाजाचा एक तरी लोकप्रतिनिधी जावली पंचायत समितीमध्ये असावा अशी मागणी आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात येत असून आगामी काळामध्ये प्रत्येक गटात व गणात आंबेडकरी चळवळीची निर्णायक ताकद नक्कीच बघायला मिळेल , रिपाई चे जावली तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी जावली तालुक्यातील प्रत्येक गावागावात आंबेडकरी संघटन मजबूत निर्माण केले असून अन्याय अत्याचाराच्या विरोधात ताकतीने समाजाच्या बाजूने उभे राहिलेले आहेत त्यामुळे बहुसंख्येने समाज एकनाथ रोकडे व रिपाईच्या पाठीशी ठामपणे उभा आहे .

       सातारा जावली विधानसभेचे आमदार महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री आदरणीय श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांनी जावली तालुक्यातील आंबेडकरी संघटनेच्या मागणीचा विचार करून ज्यापद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले त्याच पद्धतीने आदरणीय मंत्री श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आंबेडकरी समाज्याला सोबत घेऊन जावली पंचायत समितीमध्ये एकातरी जागेवर वंचित घटकांना नेतृत्व करण्याची संधी द्यावी व सत्तेत सहभागी करावे अशी मागणी आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात येत असून त्या मागणीचे अधिकृत रिपाईच्या वतीने पत्रक लवकरच आदरणीय मंत्री श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना देण्यात येणारा आहे अशी माहिती एकनाथ रोकडे यांनी दिली.

      जावली तालुक्यामध्ये आंबेडकरी संघटनेचे मतदान प्रत्येक गटात आणि गणात निर्णायक असून वंचित घटकांचे सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये रिपाई चे सातारा जिल्हा अध्यक्ष अशोकराव बापू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आंबेडकरी संघटनेची एकत्र मुठ बांधून एससी, एसटी व बहुजन समाजातील वंचित घटकांना एकत्र करून रिपाई पक्षाच्या *ऊस शेतकरी* या चिन्हावर निवडणूक लढऊन जास्तीत जास्त तरुणांना नेतृत्व करण्याची संधी देण्याबाबतचा विचारही मीटिंगमध्ये करण्यात आला.

   मागासवर्गीय वंचित, शोषित घटकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एस सी प्रवर्गाची २०११ सालची जनगणना गावपुडाऱ्यांनी घरात बसून चुकीची केली व चुकीची लोकसंख्या लावल्यामुळे पंचायत समिती चे हक्काचे आरक्षण गेले व त्यामुळे गेले तीस वर्ष जावली तालुक्यातील आंबेडकरी समाज सत्तेपासून वंचित राहिलेला असून मागासवर्गीय समाज्याला जाणीवपूर्वक सत्तेपासून दूर ठेवण्याचे पाप स्थानिक तत्कालीन पुढाऱ्यानीं केले आहे .

       याप्रसंगी रिपाई चे जावली तालूका अध्यक्ष एकनाथ रोकडे, भारतीय बौद्ध महासभेचे जावली तालूका अध्यक्ष संतोष खरात, रिपाईचे करहर विभाग अध्यक्ष विशाल सकपाळ,वसंतराव चव्हाण गुरुजी, दत्तात्रय जाधव, नितीन जाधव,डॉ मिलिंद गायकवाड, हेमंत गायकवाड,रेश्मा ताई खरात, विजय गंगावणे , निलेश शिंदे,महेंद खरात , अनिल शिंदे, विजय शिंदे, वसंत गायकवाड, सचिन गंगावणे इत्यादी रिपाईचे म्हसवे गटातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

       तसेच आंबेडकरी संघटनेच्या मागणीचा विचार मित्रपक्षाने करावा अन्यथा वंचित ,बुद्धिस्ट सर्व समविचारी संघटनांची बैठक घेऊन सर्व बहुजनांची एकत्र मोळी बांधून तालुक्यांमध्ये येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आंबेडकरी संघटना ताकतीने उतरण्याचा निर्धार सर्वानुमते करण्यात आला.