

▪️गाडगेबाबांचे विचार प्रेरणादायी – व्ही टी माळी
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)
धरणगाव(दि.23फेब्रुवारी):-शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा शतकोत्तरी जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी डी पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील जेष्ठ शिक्षीका एम के कापडणे होते. मान्यवरांच्या हस्ते कीर्तनातून बहुजनांचे प्रबोधन करणारे, थोर समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. व्ही टी माळी यांनी गाडगेबाबा यांची दशसूत्री सांगून बाबांचे सामाजिक कार्य विशद केले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शालेय परिसर स्वच्छ करून बाबांना आदरांजली वाहिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील तर आभार एच डी माळी यांनी मानले.







