बैल गाभण,तेरावा महिना!

299

 शिंदे मुख्यमंत्री असताना कुठेतरी जाऊन आले. म्हणे मी हजारो कारखानदारांना महाराष्ट्रात कारखाने टाकण्यासाठी आमंत्रित केले.मोठी गुंतवणूक करणार आहेत.असे बोलून त्यांनी त्यांच्याच हाताने स्वताची पाठ थोपटून घेतली. आता तीन वर्षे झालीत. कुठे कोणता कारखाना टाकला यांची सुद्धा माहिती शिंदेंनी जाहीर करावी. तर मग आम्ही त्यांची पाठ थोपटू.

   आपले मुख्यमंत्री कुठेतरी जातात.सरकारी खर्चाने मित्र मैत्रिणी गोतावळा नेतात. मजा मारतात.इकडे येऊन थापा मारतात. आम्ही करोडोंची अब्जोची गुंतवणूक महाराष्ट्रात आणत आहोत. तरूण खुष होतात.वाट पाहातात. बरे झाले!आता आपल्याला महाराष्ट्रातच नोकरी मिळेल. असे म्हणत वर्षं गेले.दोन वर्षे गेली. तीन वर्षे गेलीत. पण एकही कारखाना टाकला नाही. तरूण हवालदिल झाले. नोकरीचे वय निघून गेले.पुढे काय? इंजिनिअर झालेल्या तरूणाला धड नगरपालिका आणि जिल्हा परिषद मधे सिपाई ची सुद्धा नोकरी मिळत नाही.नोकरी नाही म्हणून लग्न होत नाही.

   उलट काही कारखानदार तर महाराष्ट्र सोडून बिस्तरा गुंडाळून पळून गेले. नको तो महाराष्ट्र. नको तो दंगा. नको ती हाणामारी.नको ती जाळपोळ. येथे तीनशे वर्षांपूर्वीची कबर उखडण्याचे काम चालू असेल, शंभर वर्षांपूर्वीची कुत्र्याची समाधी तोडायची असेल. या वादात महाराष्ट्र व्यस्त आहे. कोणी आलतू फालतू माणूस नव्हे चक्क मुख्यमंत्री आणि छत्रपती सुद्धा. अशा लोकांना कोण आवर घालणार? ज्यांना शहाणे समजत होतो त्यांनाच शहाणपणा शिकवण्याची गरज आहे.तेथे आपण आपले भांडवल अडकवून कारखाना टाकून का जोखीम घ्यावी?

     कंगना राणावतचा छळ,राणा दांपत्याचा छळ,दिशा सालियनची आत्महत्या, बीडमधील सरपंच खून प्रकरण, औरंगजेबची कबर, कुत्र्याची समाधी, कुणाल कामराचे गाणे इतके गंभीर प्रश्न असतांना कारखाना, रोजगार कडे कोण लक्ष देईल?जर आवादा कंपनी कडून मंत्री आणि मंत्रीचे चमचे खंडणी मागत असतील तर आपण कामगारांचे पगार द्यायचे कि खंडणी द्यायची? जर कोणी कऱ्हाड ने खंडणी मागितली तर तक्रार कोणाकडे करायची? जर कऱ्हाड हाच सरकारचा जावई असेल तर!

     आता महाराष्ट्रातील तरूण तो मराठा असो कि अन्य ओबीसी, एसीएसटी सर्वच आपला अभिमान, स्वाभिमान,दुराभिमान जपण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. विरोधात बोलला, कॉमेडी केली किंवा हासला तरीही गुंडागर्दी करून तोडफोड करतो. जेथे जेथे त्या कुणाल कामराने गाणे गायले तेथे तेथे जाऊन सत्यानाश करतो. असे करण्याला शिंदे प्रतिक्रिया म्हणतात. फडणवीस छद्मी हासतात. म्हणजे हे मराठी लोक आता कामधंदा, नोकरी करण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीत. त्यापेक्षा आपले भांडवल, आपले कारखाने इतर राज्यात नेलेले बरे!……..

      शिंदे, फडणवीस, पवार मंडळी आपली खुर्ची सांभाळण्यासाठी विकासाकडे लक्ष देत नाहीत. ठाकरे सुद्धा याहून वेगळा विचार करीत नाहीत. म्हणून समोर आले तर हो म्हणायचे आणि प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्रात कारखाने टाकायचे नाही. अशी धारणा उद्योजकांची झालेली आहे. म्हणून ते महाराष्ट्रात येत नाहीत. तरूणांचा धीर सुटत चालला आहे. मुख्यमंत्री तरूणांना सांगत आहेत, आपला बैल गाभण आहे. अजून तेरावा महिना लागला आहे. तो जनला तर तुम्हाला खिरूज मिळेलच. त्याचे दूध काढून आपण दही, मही, लस्सी पिवू.

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२