Home महाराष्ट्र “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय” हे पूर्ण नाव तात्काळ ठळक अक्षरात दर्शविण्यासाठी...

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय” हे पूर्ण नाव तात्काळ ठळक अक्षरात दर्शविण्यासाठी महापौर व उपमहापौर यांना निवेदन

135

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.1मार्च):- अंधेरी (पश्चिम) विधानसभेतील महानगरपालिकेचे कूपर हॉस्पिटल येथे सुरू करण्यात आलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आलेले आहे परंतु महाविद्यालयात लावलेले फलक हे “H.B.T.Medical college” व हिं. बा. ठा.वैद्यकीय महाविद्यालय असे संक्षिप्त स्वरूपात होते.

त्यासाठी मुंबई च्या प्रथम नागरिक महापौर सौ.रितू तावडे, उपमहापौर श्री.संजय घाडी व कूपर हॉस्पिटल चे डीन डॉक्टर श्री. देविदास शेट्टी यांना भेटून सर्व नामफलकांवर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय” हे पूर्ण नांव तात्काळ ठळक अक्षरात दर्शविण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले.

तेव्हा महापौरांनी तात्काळ ह्यावर कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागला दिले याप्रसंगी विधानसभा समन्वयक सुरेश मांगेला, उपविभाग समन्वयक स्वप्निल जयस्वाल, पराग कदम व कैलाश चौगुले उपस्थित होते.