

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.4मार्च):-इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्या जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) अंतिम परीक्षेत गंगाखेड शहराचे तेजस प्रविण भंडारी आणि नंदिनी शरदकुमारजी भुतडा यांनी उज्वल यश संपादन केले आहे.नंदिनी भुतडा यांनी ग्रुप–I मध्ये फायनान्शियल रिपोर्टिंग,ॲडव्हान्स्ड फायनान्शियल मॅनेजमेंट तसेच ॲडव्हान्स्ड ऑडिटिंग,अॅश्युरन्स अँड प्रोफेशनल एथिक्स या विषयांत मिळून १५३ गुणांसह परीक्षा उत्तीर्ण झाली.तर तेजस भंडारी यांनी सीए अंतिम परीक्षेतील दोन्ही ग्रुपमध्ये घवघवीत यश मिळवत ग्रुप–I मध्ये २१० व ग्रुप–II मध्ये १६० असे एकूण ३७० गुण मिळवत यशस्वी झाला.
या यशामुळे गंगाखेड शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून,दोघांवरही भंडारी,भुतडा,बंग, राठी कुटुंबीय,मित्रपरिवार आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.







