Home दिल्ली इराण अमेरिका इस्रायल युद्ध भारताच्या आसपास पसरताना दिसत आहे!

इराण अमेरिका इस्रायल युद्ध भारताच्या आसपास पसरताना दिसत आहे!

255

▪️ज्येष्ठ पत्रकार विनय जोशी यांचे मनोगत !!

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

इराणी नौसेनेची फ्रिगेट देना अमेरिकन पाणबुडीने डागलेल्या टॉरपेडो मुळे श्रीलंकेच्या समुद्रात बुडाली. विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या “मिलन २०२६” या बहुदेशीय अभ्यासानंतर इराणकडे जाताना या लढाऊ जहाजावर अमेरिकन पाणबुडीने हा हल्ला केला. यात ४० नौसैनिक श्रीलंकन सैन्याने वाचवले आणि १०० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले. अमेरिकन युद्धमंत्री हेगसेथ याने हा हल्ला केल्याची कबुली दिली.

युद्धक्षेत्रापासून खूप लांब असताना आंतरराष्ट्रीय समुद्रात असलेले लढाऊ जहाज बुडवल्याने अमेरिकेची जगभर निर्भर्त्सना होत आहे.

अमेरिकन कॅरीअर स्ट्राइक ग्रुप अब्राहम लिंकनच्या ताफ्यातील एका डिस्ट्रॉयरवर आणि तिच्यात इंधन भरणाऱ्या सप्लाय शिपवर इराणी मिसाईल हल्ल्यात दोन्ही जहाजे बुडण्याच्या मार्गावर असल्याचा दावा आज सकाळी इराणी सैन्याने केला होता, त्याला उत्तर म्हणून हे जहाज अमेरिकेने बुडवल्याची चर्चा आहे. हा हल्ला इराणी सैन्याने अरबी समुद्रात मुंबई बंदरापासून ३५० किमीवर केल्याचा साधारण अंदाज व्यक्त होत आहे.

या घटनेमुळे इराण युद्धाची व्याप्ती भारतीय समुद्राच्या आसपास वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. एकेक करत संपूर्ण जगाला युद्धात ओढण्याची चढाओढ इराण आणि अमेरिकेत सुरू असल्याचं दिसत आहे.