

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
▪️फुले एजयुकेशन तर्फे सावित्रीमाईच्या जीवनावर कविता सादर…
म्हसवड(दि.11मार्च):- ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 129 व्या स्मृतिदिनी सकाळी 9.30 वा. फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन तर्फे सारसबाग येथील सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक आणि महात्मा फुले मंडळाचे माजी अध्यक्ष रामचंद्र शेवते यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महात्मा फुले मंडळाचे माजी अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक मा.मधुकर राऊत, सुधीर पैठणकर ,विजय कोठावळे, दत्ता घारमाळकर,महादेव गोरे उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ ढोक यांनी जेष्ठ गीतकार प्रवीण दवणे यांनी सावित्रीमाई यांच्या जीवनावरील लिहिलेली “ज्ञानज्योती” कविता सादर करून सपुर्ण सावित्रीमाई चा त्याग ,संघर्ष आणि महिलांसाठी प्रथम शाळा सुरु केल्याचे सांगितले .तसेच भिडे वाडा यावर नुकतेच 6 मार्च 2026 रोजी आलेला “भिडे वाडा” हा चित्रपट प्रदर्शित झालेला असून या मध्ये अनेक नामवंत दिग्गज कलाकाराने काम केलेले आहे. हा सिनेमा शिवानी राजेशिर्के आणि अजित शिरोळे यांनी दिग्दर्शन केल्याचे सांगून आपण सर्वांनी हा चित्रपट संपूर्ण परिवारासह पहावे तसेच सावित्रीमाई वरील चालू असलेली स्टार प्रवाह – टीव्ही सिरीयल नित्य नियमाने पहावे असे देखील आव्हान केले.
त्यांच्या सामाजिक व इतर अनेक विशालकाय कार्यामुळेच आपण महात्मा फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक आणि सावित्रीमाई यांना स्री शिक्षणाच्या आद्यप्रणेत्या संबोधत आहोत. ढोक म्हणाले की फुले दाम्पत्य यांचे कार्याचा वसा ,वारसा पुढे घेऊन जाणे ही आपल्या पिढीची नैतिक जबाबदारी आहे. आणि या फुले दाम्पत्यांचा मी एक धागा पकडून महाराष्ट्र व तेलगांना राज्यात गेल्या 5 वर्षात 54 सत्यशोधक विवाह आणि 15 गृहप्रवेश सोहळे सत्यशोधक पद्धतीने मोफत पार पाडले परंतु त्यांचे प्रमाण खूप कमी आहे. खरे तर प्रत्येक घरात सत्यशोधक कार्य घडले तरच आपण या महापुर्षाना अभिवादन केल्याचे मनाला आत्मिक समाधान मिळेल असे देखील ढोक म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कोठावळे यांनी केले तर आभार मधुकर राऊत यांनी मानले.यावेळी सर्व मान्यवरांना संस्थेचे वतीने ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले ग्रंथ भेट देण्यात आले.







