Home महाराष्ट्र सावित्रीबाई फुले यांची जयंती राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा व्हावा:प्रा दीपमाला

सावित्रीबाई फुले यांची जयंती राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा व्हावा:प्रा दीपमाला

168

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.11मार्च):- 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्याचे कारण अमेरिकेतील महिलांनी आपल्या हक्कासाठी शासनाकडे मोर्चा काढून आंदोलने करून आपले हक्क 8 मार्च 1913 रोजी महिलांना न्याय हक्क मिळवून दिले म्हणून जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो परंतु खऱ्या अर्थान आपल्या भारत देशात क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले मुळे महिलांना शिक्षणाच्या अधिकार आणि समाजात उभे राहण्याची प्रेरणा सावित्रीबाई फुले यांच्या मुळे मिळाली आहे. म्हणूनच आज महिला सर्वत्र शिकलेल्या व सर्वच क्षेत्रात आघाडीवर दिसून येत आहे. करिता आपण सर्व महिलांनी मिळून 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा सरकारने करायला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपण महिलांना समाधान मिळेल असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर दीपमाला रायठक यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. 

दिनांक 9 मार्च रोजी ईश्वरी विद्यालय ब्रह्मकुमारीज केंद्र गंगाखेड येथे शहरातील विविध क्षेत्रातील पाच गुणवंत महिलांचा गौरव सत्कार तहसीलदार उषा किरण शृंगारे केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी सत्यादीदी बळीराजा शिक्षण संस्थेच्या चित्राताई गोळेगावकर समाजसेवक शिक्षक नेते बाळासाहेब राखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्मान करण्यात आला यावेळी संत जनाबाई महाविद्यालयाच्या प्राध्यापिका दीपमाला रायठक यांनी महिला दिनाच्या अनुषंगाने महिला विषयीची भूमिका व्यक्त केली. 

जागतिक महिला दिनानिमित्त ईश्वरी विद्यालय यांच्या वतीने समाजातील पाच आदर्श महिलांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यामध्ये सामाजिक क्षेत्रातून माया औसेकर, स्वच्छत दूत धार्मिक क्षेत्रातून ज्ञानेश्वरी लटपटे, आरोग्य क्षेत्रातून माला घोबाळे, धार्मिक मंदिर सेवा क्षेत्रातून उषा पूले, योगा क्षेत्रातून रुक्मिणी लटपटे* प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार उषाकिरण शृंगारे, बळीराजा शिक्षण संस्थेच्या सर्व सर्व चित्राताई गोळेगावकर, समाजसेवक तथा शिक्षक नेते बाळासाहेब राखे डॉ कैलास चांदकर अध्यक्षस्थानी सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी सत्यादीदी तर व्याख्याता म्हणून प्रा डॉ दीपमाला मॅडम आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना म्हणाले की स्त्रियांचा मानवी कल्याणासाठी खूप मोठा त्याग आहे या त्यागामध्ये मा जिजाऊ गौतम बुद्धाची पत्नी यशोधरा सावित्रीबाई फुले अहिल्यादेवी रमाबाई आंबेडकर यांच्यासह अनेक महिलांचे महिलांसाठी योगदान आहे. आजच्या महिलांनी मोबाईल चा फेसबुक इंस्टाग्राम अन्य सोशल मीडियापासून दूर राहावे. राष्ट्रीय महिला दिन साजरा व्हावा यासाठी आपण स्त्रियांनी गंगाखेड मधून शासनाकडे मागणीसाठी चळवळ उभी करूया

यावेळी तहसीलदार उषा किरण शृंगारे, बाळासाहेब राखे, डॉक्टर कैलास चांदकर अध्यक्षीय समारोप प्रमुख कुमारी सत्यादी यांनी केला.

स्वागत गीत पूजा माने, सूत्रसंचालन कुमारी श्रेया बंडेवार तर आभार ब्रह्मकुमारी शितल दीदी यांनी मानले