Home महाराष्ट्र नगर परिषद गाळ्याचे बांधकाम भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची केली मागणी

नगर परिषद गाळ्याचे बांधकाम भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची केली मागणी

424

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.12मार्च):- गंगाखेड नगर परिषद मधील प्रशासकीय काळात मार्जितील व्यपारांशी संगनमत करून घेतलेल्या बेकायदेशीर निर्णय रद्द करणे व झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी गंगाखेड नगर परिषद च्या लोकनियुक्त अध्येक्ष सौ. उर्मिला मधुसूदन केंद्रे यांनी जिल्हा अधिकारी यांना लेखी तक्रार दाखल करण्यात आली. 

  गंगाखेड नगर परिषदच्या या निर्णया बाबत जाणीव पूर्वक चुकीचा संभ्रम पसरवत जात असून काही मोजक्या व्यक्तीना बेकायदेशीर कूर्त्यावर पांघरून घालून प्रशासन काळात घेतलेले काही निर्णय, नियमांना बगल देऊन घेतलले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या निर्णयाची चौकशी करणे म्हणजे व्यपाऱ्या वर अन्याय नसून भ्रष्टचाराला आळा घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे.

जर साठ गळयांची जागा असताना केवळ वीस गळ्याचे बांधकाम करून उर्वरित रक्कम कुठे गेली? या बाबत प्रश्न होत असतील तर हे नुकसान गंगाखेड च्या सर्वसामान्य जनतेचे आणी नगर परिषद च्या तिजोरीचे होत आहे, लिलाव प्रक्रिया (e-tender) न राबवता गाळे वाटप करणे हा बेकायदेशीर आहे, पारदर्शक प्रक्रिया होणे आवश्यक असूनयात व्यपारी यांचे हित आहे. खऱ्या व्यपाऱ्याला कधीही कायद्याची भीती नसते, भीती त्यांनाच वाटते ज्यांनी संगमताने बेकादेशीर काम करण्यात आले आहे.